Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

कुपोषण कमी करण्यासाठी मुलांना मोहाच्या फुलाचे लाडू

पौष्टिक आहाराचा अभाव आणि कुपोषणामुळे राज्यातील लहान मुले आणि किशोरवयीन मुलांमध्ये अॅनिमियाचे प्रमाण वाढत आहे. याला प्रतिबंध करण्यासाठी राज्यातील कुपोषित मुलांना मोहाच्या फुलांपासून बनविलेले लाडू देण्याच्या सूचना कुपोषणमुक्त कृती दलाने दिले आहेत. राज्यातील कुपोषणाबाबत जिल्हानिहाय आढावा बैठकीत या सूचना देण्यात आल्या.

अधिक माहिती
● या पौष्टिक आहारामुळे शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढून अॅनिमियाचे प्रमाण कमी होईल, असा विश्वास कृती दलाने व्यक्त केला आहे.
● राज्याच्या आरोग्य विभागाने 0 ते 18 वर्षे वयोगटातील बालकांच्या केलेल्या आरोग्य तपासणीत 70,000 हून अधिक बालके आणि किशोरवयीन मुलांमध्ये अशक्तपणा असल्याचे आढळून आले आहे.
● याबरोबर राज्यातील प्रत्येक महिला अॅनिमियाने त्रस्त असल्याचे आढळून आले आहे .
● ही संख्या आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारकडून विविध उपाय योजना आखल्या जातात.
● यामध्ये अॅनिमियाग्रस्तांना लोहाच्या गोळ्या दिल्या जातात.
● यासंदर्भात आता कुपोषण मुक्त कृती दलाचे अध्यक्ष डॉक्टर दीपक सावंत यांनी मोहाच्या फुलांचे लाडू देण्याची सूचना दिली आहे.
गडचिरोलीत यापूर्वीच पुढाकार…
● मोहफुलापासून तयार केलेले लाडू सकस आहार म्हणून वापरात आणले जाऊ शकतात, हे प्रयोगाअंती सिद्ध झाल्यावर गडचिरोलीतील काही संस्थांनी ते अंगणवाडी केंद्रात वाटप करणे सुरू केले. त्याची दखल घेत ओडिशा सरकारनेसुद्धा हा प्रयोग सुरू केला. त्याला आता पाच वर्षे लोटली.

मोहाच्या फुलाचे फायदे
● मोहाच्या फुलातून व्हिटॅमिन सी, प्रथिने, लोह, कॅल्शियम, फॉस्फरस आणि कार्बोहायड्रेट मिळतात, ज्यामुळे शरीर निरोगी राहण्यासोबतच हिमोग्लोबिनचे प्रमाणही वाढते.
● अशक्तपणाचे रुग्ण त्यांच्या दैनंदिन पौष्टिक आहारासोबत अतिरिक्त पौष्टिक अन्न म्हणून मोहाच्या फुलांचे लाडू घेऊ शकतात.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *