कृष्णकुमार यांची मणिपूर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशपदी निवड
- मणिपूर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून डी. कृष्णकुमार यांचा शपथविधी झाला.
- राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांच्या उपस्थितीत राजभवनात कृष्णकुमार यांना शपथ देण्यात आली.
- न्या. सिद्धार्थ मृदाल यांची निवृत्तीनंतर कृष्णकुमार यांची वर्णी लागली आहे.
- न्यायमूर्ती डी कृष्णकुमार यांनी यापूर्वी मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून काम केले आहे.
- न्यायमूर्ती कृष्णकुमार यांची 7 एप्रिल 2016 रोजी मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती आणि ते 21 मे 2025 रोजी निवृत्त होणार आहेत.
- ते त्यांच्या मूळ उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांनंतरचे सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश आहेत .
मल्याळम नाटककार पिल्लईंचे निधन
- प्रसिद्ध मल्याळम नाटककार व लेखक प्रा. ओमचेरी एन. एन. पिल्लई यांचे वयाच्या 100 व्या वर्षी दिल्लीत निधन झाले.
- त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार आणि केरळ साहित्य अकादमी पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते.
- त्यांचा जन्म केरळमधील कोट्टायम येथे 1 फेब्रुवारी 1924 रोजी झाला. अनेक दशकांपासून ते दिल्लीत राहत होते.
डॉ. बत्रा यांना कर्मयोगी पुरस्कार
- ईशान्य भारतात मेघालयातील खासी आदिवासींमध्ये आरोग्य सेवेचे काम करणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते डॉ. विश्वामित्र बत्रा यांना ‘माय होम इंडिया’ या संस्थेतर्फे 11 वा स्वामी विवेकानंद स्मृती कर्मयोगी पुरस्कार दिला जाणार आहे.
- 27 नोव्हेंबरला दिल्लीत होणाऱ्या कार्यक्रमामध्ये रा.स्व. संघाचे सहसरकार्यवाह डॉ. कृष्ण गोपाल यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
- ईशान्य भारतात सेवाभावी काम करणाऱ्या माय होम इंडियातर्फे दरवर्षी स्वामी विवेकानंद कर्मयोगी पुरस्कार देण्यात येतात.