‘रिंगाण’ या कादंबरीत प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्यांच्या परवडीचे अंतर्मुख करणारे चित्र रेखाटणारे नामवंत लेखक कृष्णा खोत यांना 2023 या वर्षीचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर करण्यात आला.
• कोंकणी भाषेतील लघुकथेसाठी प्रकाश एस. पर्येकर यांच्या ‘वर्सल’ या कथासंग्रहाला पुरस्कार मिळाला आहे.
• हिंदी भाषेसाठी पुरस्कार लेखक संजीव यांना त्यांच्या ‘मुझे पहचानो’ या कादंबरीसाठी जाहीर झाला.
• 2023 सालचे साहित्य अकादमी पुरस्कार 9 कविता संग्रह, 6 कादंबऱ्या, 5 लघुकथा, 3 निबंध आणि 1 साहित्यिक अभ्यासाला मिळाले आहेत.
• अकादमीचे सचिव के. श्रीनिवासराव यांनी साहित्य अकादमीच्या पुरस्काराची घोषणा केली.
• अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत देशातील 24 प्रादेशिक भाषेतील साहित्यासाठी पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.
कृष्णात खोत
• कृष्णात खोत यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण लेखनाने कादंबरीकार अशी स्वतःची ओळख निर्माण केली आहे.
• ‘गावठाण’(2005), ‘रौंदाळ’(2008), ‘झड – झिम्बड’(2012), ‘धूळमाती’(2014), ‘रिंगाण’(2018) या कादंबऱ्यातून खोत यांनी बदलत्या ग्रामीण जीवनाचे वास्तव चित्रण केले आहे.
• गाव संस्कृती खेड्यातील बदलता जीवन संघर्ष हा त्यांच्या लेखनाचा आत्मा आहे.
• ही कादंबरी शब्द पब्लिकेशन ने प्रकाशित केली आहे.
• मराठी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार निवडीच्या परीक्षक मंडळावर अभीराम भडकमकर, डॉक्टर संतोष खेडलेकर आणि श्रीमती अनुराधा पाटील यांचा समावेश होता.
• एक लाख रुपये, ताम्रपत्र, शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
• पुरस्कार समारंभ 12 मार्च 2024 रोजी आयोजित करण्यात येणार आहे.
साहित्य अकादमी
• स्थापना :12 मार्च 1954
साहित्य अकादमी पुरस्कार
• हा पुरस्कार साहित्य अकादमीतर्फे दरवर्षी देण्यात येतो.
• दरवर्षी अकादमी तर्फे मान्यता देण्यात येणाऱ्या भाषेतील 24 कलाकृतींना पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
• यात संविधानातील 22 भाषांसहित इंग्रजी आणि राजस्थानी या दोन भाषांचा समावेश होतो.
• ज्ञानपीठ पुरस्कारानंतर साहित्य अकादमी पुरस्कार हा भारत सरकारचा द्वितीय सर्वोच्च साहित्य सन्मान आहे.