गुजरात मधील केवडिया येथे बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाची (MoPSW) 19वी सागरी राज्य विकास परिषद (MSDC) सुरु झाली. केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी या दोन दिवसीय परिषदेचे अध्यक्षपद भूषविले. सागरी राज्य विकास परिषद ही एक सर्वोच्च सल्लागार संस्था असून, सागरी क्षेत्राच्या विकासासाठी आणि प्रमुख बंदरांव्यतिरिक्त इतर बंदरांचा एकात्मिक विकास सुनिश्चित करण्यासाठी मे 1997 मध्ये तिची स्थापना करण्यात आली होती. परिषदेच्या पहिल्या दिवशी, विविध प्रकल्पांचा विकास, समस्या आणि या क्षेत्रासमोरील आव्हाने आणि यशाचे महत्वाचे टप्पे, या मुद्द्यांवर अभ्यासपूर्ण सत्रे आयोजित करण्यात आली होती. प्रमुख आणि लहान, किनारी बंदरे आणि सागरी बोर्ड यांच्यात चांगला समन्वय साधण्यासाठी या सत्रांमध्ये विविध कल्पना मांडल्या गेल्या.


