Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

क्रीडा मंत्रालयाने खेळाडू आणि संघ अधिका-यांसाठी भोजन आणि निवास व्यवस्थेची कमाल मर्यादा 66% ने वाढवली

  • Home
  • Current Affairs
  • क्रीडा मंत्रालयाने खेळाडू आणि संघ अधिका-यांसाठी भोजन आणि निवास व्यवस्थेची कमाल मर्यादा 66% ने वाढवली
  • भारतीय क्रीडापटू आणि संघ अधिकाऱ्यायांना भोजन आणि निवासासाठी (बोर्डिंग आणि लॉजिंग) दिल्या जाणाऱ्या रकमेची कमाल मर्यादा युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने 66% ने वाढवली आहे.
  • मंत्रालयाच्या राष्ट्रीय क्रीडा महासंघांना (एनएसएफ) साहाय्य योजनेअंतर्गत ही तरतूद केवळ आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेणार्‍या खेळाडूंसाठी आणि अधिकार्‍यांसाठी आहे.
  • नवीन सुधारित नियमांनुसार, परदेशात मान्यताप्राप्त स्पर्धांसाठी प्रवास करणारे खेळाडू आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांना आता प्रतिदिन 250 अमेरिकन डॉलर मिळतील. याआधी ही तरतूद प्रतिदिन 150 अमेरिकन डॉलर मिळायचे.
  • राष्ट्रीय क्रीडा महासंघांच्या विनंत्या विचारात घेऊन ही सुधारणा करण्यात आली आहे. स्पर्धांच्या स्थानिक आयोजन समितीने (LOC) निश्चित केलेले बोर्डिंग आणि लॉजिंगचे दर सध्याच्या 150 अमेरिकन डॉलर प्रतिदिन या कमाल मर्यादेपेक्षा जास्त आहेत, हे या महासंघांनी विनंती अर्जात नमूद केले होते.
  • बोर्डिंग आणि लॉजिंगचे हे निकष नोव्हेंबर 2015 मध्ये निश्चित करण्यात आले होते आणि त्यात सुधारणा होऊन आठ वर्षे झाली आहेत.
  • या नव्या निर्णयामुळे विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करताना राष्ट्रीय क्रीडा महासंघांच्या खेळाडूंची वाजवी दरात उत्तम राहण्याची व्यवस्था होऊ शकेल.

 

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *