Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

खांदेरी किल्ला संरक्षित स्मारक म्हणून घोषित

  • Home
  • Current Affairs
  • खांदेरी किल्ला संरक्षित स्मारक म्हणून घोषित
  • अलिबाग तालुक्याजवळ अरबी समुद्रात असलेल्या बेटावरील खांदेरी किल्ला हा राज्य सरकारने संरक्षित स्मारक म्हणून घोषित केला आहे.
  • राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने अधिसूचना जारी केली त्यामुळे आजवर दुर्लक्षित असलेल्या या सागरी किल्ल्याच्या जतन- संवर्धनाचा अधिकार राज्य सरकारच्या पुरातत्त्व विभागाला प्राप्त होणार आहे.
  • सागरी सुरक्षेच्या दृष्टीने या बेटाचे महत्त्व ओळखून 1672 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी या निर्जन बेटावर तटबंदी उभारण्याचे काम सुरू केले होते. मात्र त्यावेळी झालेल्या विरोधामुळे हे काम अर्धवट सोडून द्यावे लागले होते.
  • 1679-80 या कालावधीत महाराजांनी ब्रिटिश, पोर्तुगीज, मुघल आणि सिद्धी यांचा विरोध मोडीत काढून किल्ल्याचे बांधकाम पूर्ण केले होते.
  • छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात हा किल्ला मराठा साम्राज्याचा प्रमुख नाविक तळ म्हणून उदयास आला.
  • दीर्घकाळ मराठा साम्राज्याचे यावर वर्चस्व राहिले.
  • यानंतरच्या काळात सरखेल कान्होजी राजे आंग्रे कोकण किनारपट्टीवर मराठा आरमाराची बांधणी आणि साम्राज्यविस्ताराला सुरुवात केली.
  • यानंतर कोकणात सागरी वाहतुकीवर त्यांची दस्तक घेणे सर्वांना बंधनकारक केले.
  • यामुळे संतापलेल्या ब्रिटिश आणि पोर्तुगिजांनी 12 नोव्हेंबर 1779 रोजी या किल्ल्यावर एकत्रित हल्ला चढवला. मात्र कान्होजींनी त्यांचा पराभव केला.
  • मुंबईत येणाऱ्या जाणाऱ्या जहाजांवर लक्ष ठेवण्याच्या दृष्टीने या किल्ल्याचे महत्त्व अनन्य साधारण होते त्यामुळे 1818 यावर्षी ब्रिटिशांनी हा किल्ला ताब्यात घेतला जवळपास सहा हेक्टर परिसरात हा किल्ला पसरलेला असून किल्ल्याची तटबंदी बऱ्यापैकी रुंद आहे.
  • किल्ल्याला 21 बुरुज दोन दरवाजे यापैकी महाद्वार नष्ट झाले असून पश्चिमेकडील चोर दरवाजा शाबूत आहे .
  • किल्ल्यात चार विहिरी आणि जुन्या इमारतींचे अवशेष शिल्लक आहे.
  • किल्यावर सध्या दीपगृह अस्तित्वात आहे.
  • कोळी समाजाचे देवस्थानही आहे.
  • गेली अनेक वर्ष हा किल्ला दुर्लक्षित अवस्थेत पडून होता मात्र आता हा किल्ला पुरातत्व विभागाने संरक्षित स्मारक म्हणून घोषित केला आहे.
  • त्यामुळे सागरी किल्ल्याची देखभाल दुरुस्ती करणे शक्य होणार आहे.
  • महाराष्ट्र प्राचीन स्मारके पुराणवास्तुशास्त्र विषयक स्थळे व विशेष अधिनियम 1960 अंतर्गत हा किल्ला संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आला आहे.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *