Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

गोदावरी- बनचेरेला प्रकल्पावरून आंध्र प्रदेश आणि तेलंगण यांच्यात वाद Dispute between Andhra Pradesh and Telangana over Godavari-Bancherela project

  • Home
  • June 2025
  • गोदावरी- बनचेरेला प्रकल्पावरून आंध्र प्रदेश आणि तेलंगण यांच्यात वाद Dispute between Andhra Pradesh and Telangana over Godavari-Bancherela project
Dispute between Andhra Pradesh and Telangana over Godavari-Bancherela project

● गोदावरी- बनचेरेला प्रकल्पावरून आंध्र प्रदेश आणि तेलंगण ही दोन राज्य एकमेकांसोबत उभे टाकले आहेत .

काय आहे नेमका प्रकल्प?

● पोलावरम उजव्या मुख्य कालव्याची क्षमता 17500 क्युसेकवरून 38 हजार क्युसेकपर्यंत वाढवून गोदावरीचे पाणी कृष्णा नदीकडे वळवणे हा प्रकल्पाचा उद्देश आहे.
● गुंटूर जिल्ह्यातील बोल्लापल्ली जलाशयाच्या माध्यमातून 28 हजार क्युसेक पाणी उचलले जाईल आणि बनकचेरला जलाशयाकडे पाठवले जाईल.
● आंध्र प्रदेशातील दुष्काळग्रस्त रायलसीमा प्रदेशाचे सुपीक भूमीत रूपांतरित करणे हा प्रकल्पाचा मूळ उद्देश आहे.
● हरिश्चंद्रपुरम, लिंगापुरम, व्यंदना, गंगिरेड्डीपल्ली आणि नाकिरेकल्लू येथे ‘पंपिंग स्टेशन’ बांधून बोल्लापल्ली जलाशयापर्यंत पाणी पोहोचविण्यात येईल. नल्लामला जंगलातून बोगदा बांधून पाणी या जलाशयांकडे वळवले जाईल.
● आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी गोदावरी नदीला कृष्णा नदीतून पेन्ना नदीशी जोडण्याची योजना जाहीर केली आहे; तसेच नांद्याळ जिल्ह्यातील बनकचेरला येथे एक मोठा जलाशय बांधण्याचेही प्रस्तावित केले आहे.
● तेलंगण सरकार या प्रकल्पाला तीव्र विरोध करत आहे.
● सन 2014 च्या आंध्र प्रदेश कायद्याचे हे उल्लंघन आहे, असे तेलंगण सरकारचे म्हणणे आहे.
● बनकचेरलाकडे वाहून नेण्यात येणारे पाणी हे गोदावरीचे अतिरिक्त पाणी आहे, त्यामुळे तेलंगणाच्या हितावर आघात होणार नाही, अशी आंध्र प्रदेश सरकारची भूमिका आहे.

तेलंगणचा विरोध का?

● तेलंगणचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी आणि सिंचनमंत्री, उत्तमकुमार रेड्डी यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि जलशक्तीमंत्री सी. आर. पाटील यांना पत्र लिहू या प्रकल्पाला विरोध केला आहे.
● या पत्रातील दाव्यानुसार, हा प्रकल्प कृष्णा आणि गोदावरी नद्यांच्या पाण्याच्या वाटपावर परिणाम करणार असून, ते तेलंगणाच्या हिताच्या विरोधात आहे.
● कायद्यानुसार, दोन्ही राज्यांना समान हक्काने नद्यांचे मिळावे; पण आंध्र प्रदेशाच्या या योजनेमुळे तेलंगणाचा पाण्यावरील हक्क धोक्यात येऊ शकतो. त्यामुळे, केंद्र सरकारने हा प्रकल्प थांबवावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *