- ज्येष्ठ जीवरसायन शास्त्रज्ञ गोविंदराजन पद्मनाभन यांची पहिल्या विज्ञानरत्न पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
- केंद्र सरकारने याच वर्षी हा पुरस्कार सुरू केला आहे .
- सरकारने 33 राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार जाहीर केले.
- यामध्ये युवा शास्त्रज्ञांसाठीचा विज्ञान युवा पुरस्कार 18 जणांना जाहीर झाला असून 13 जणांना विज्ञान श्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
- चांद्रयान तीन मोहीम यशस्वीपणे राबविलेल्या शास्त्रज्ञांच्या गटाला ‘विज्ञान टीम’ पुरस्कार जाहीर झाला आहे .
- या वर्षाच्या सुरुवातीला, सरकारने विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोपक्रम क्षेत्रातील संशोधक, तंत्रज्ञ आणि नवोन्मेषकांच्या उत्कृष्ट आणि प्रेरणादायी वैज्ञानिक, तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण योगदानाची दखल घेऊन ‘राष्ट्रीय विज्ञान’ पुरस्काराची स्थापना केली होती.
गोविंदराजन पद्मनाभन
- गोविंदराजन पद्मनाबन (जन्म 20 मार्च 1938, मद्रास येथे ) भारतीय जैवरसायनशास्त्रज्ञ आणि जैवतंत्रज्ञ आहेत.
- ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISc) चे माजी संचालक होते आणि सध्या IISc मधील बायोकेमिस्ट्री विभागात मानद प्राध्यापक आणि सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ तामिळनाडूचे कुलपती म्हणून काम करतात .
पद्मनाभन यांना मिळालेले सन्मान:
- विज्ञान आणि तंत्रज्ञानासाठी शांती स्वरूप भटनागर पुरस्कार (1983)
- पद्मश्री (1991)
- पद्मभूषण (2003)
- नॅशनल अकादमी ऑफ मेडिकल सायन्सेसची निवडलेली फेलोशिप
‘मुख्यमंत्री योजनादूत‘ची घोषणा
- ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण’ या बहुचर्चित योजनेनंतर राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री योजनादूत’ ची घोषणा केली.
- सरकारच्या योजनांचा प्रचार व प्रसार करणाऱ्या राज्यातील 50 हजार तरुणांना दर महिन्याला 10 हजार रुपये याप्रमाणे सहा महिन्यांसाठी 60 हजार रुपये मानधन दिले जाणार आहे.
- यासाठी कौशल्य विकास विभागातर्फे जवळपास 300 कोटी रुपये सहा महिन्यांसाठी खर्च केले जाणार आहेत.
- महाराष्ट्र सरकारच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि मुख्यमंत्री जन-कल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे ‘मुख्यमंत्री योजनादूत’ कार्यक्रम राबविला जाणार आहे.
- राज्यात कार्यरत प्रशासकीय यंत्रणेला मदत करण्यासाठी ‘मुख्यमंत्री योजनादूत’ नेमले जाणार आहेत.
- ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक व शहरी भागात पाच हजार लोकसंख्येसाठी एक योजनादूत या प्रमाणात एकूण 50 हजार योजनादूतांची निवड करण्यात येणार आहे.
- या योजनेत सहभागी होणाऱ्या तरुणांनी भविष्यात कोणत्याही प्रकारे सरकारी नोकरीवर हक्क सांगू, नये यासाठी त्यांच्याकडून हमीपत्र लिहून घेण्याची खबरदारी सरकारने घेतली आहे.
सहा महिन्यांचा करार:
- ‘मुख्यमंत्री योजनादूता’ला प्रत्येकी 10 हजार प्रती महिना एवढे ठोक मानधन देण्यात येणार असून त्यामध्ये प्रवास आणि इतर भत्ते अंतर्भूत आहेत.
- निवड झालेल्या ‘मुख्यमंत्री योजनादूता’ बरोबर सहा महिन्यांचा करार केला जाणार आहे.
- हा करार कोणत्याही परिस्थितीत वाढविण्यात येणार नसल्याचे राज्य सरकारने प्रसिद्ध केलेल्या आदेशात स्पष्ट केले आहे.
उमेदवार निवडीसाठी पात्रतेचे निकष:
- वयोमर्यादा 18 ते 35 वर्षे
- कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर
- संगणक ज्ञान आवश्यक
- उमेदवाराकडे अद्ययावत मोबाईल असावा
- उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिवासी असणे आवश्यक
योजनादूताने करावयाची कामे:
- योजनादूत संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या संपर्कात राहून जिल्ह्यातील योजनांची माहिती घेणे
- नेमून दिलेल्या ठिकाणी समक्ष जाऊन काम करणे बंधनकारक
- सरकारच्या विविध योजनांची प्रचार आणि प्रसिद्धी करताना ग्रामपातळीवरील यंत्रणांशी समन्वय करून योजनांची घरोघरी माहिती देण्यासाठी प्रयत्न करतील.
नेमणूक प्रक्रिया
- उमेदवारांच्या नोंदणीची व प्राप्त अर्जाच्या छाननीची प्रक्रिया माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाद्वारे नियुक्त केलेल्या बाह्यसंस्थांमार्फत ऑनलाइन पूर्ण करण्यात येईल
- ऑनलाइन अर्जाची छाननी केल्यानंतर पात्र उमेदवारांची यादी प्रत्येक जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात येईल
- जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा सहायक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेल्या प्रतिनिधींच्या समन्वयाने प्राप्त अर्जाशी संबंधित उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करतील.
- प्रत्येक उमेदवाराबरोबर सहा महिन्याचा करार केला जाईल
- कराराचा कालावधी कोणत्याही परिस्थितीत वाढविला जाणार नाही.