अमेरिका, चीन आणि तत्कालीन सोव्हिएत रशिया पाठोपाठ अंतराळ महासत्ता बनण्याची महत्त्वकांक्षा बाळगलेल्या भारताने 14 जुलै रोजी चंद्रयान- 3 मोहिमेस प्रारंभ केला.
सतीश धवन अंतराळ केंद्रावरून 14 जुलै रोजी दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी चंद्रयान-3 अवकाशात झेपावले.
त्याला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचण्यासाठी 41 दिवसांचा गुंतागुंतीच्या प्रवास करावा लागणार असून 23 ऑगस्टला संध्याकाळी 5 वाजून 47 मिनिटांनी लँडर चे चंद्राच्या पृष्ठभागावर अवघड मानले जाणारे अलगद अवतरण करण्यात येईल.
चंद्रयान-3 चा असा असेल प्रवास:-
चंद्रयान-3 चा मार्ग चंद्रयान-2 सारखा आहे.
हे यान पृथ्वीभोवती पाच कक्षेतील आवर्तन पूर्ण करेल.
प्रत्येक वेळी ते पृथ्वीपासून दूर जाणारे अंतर वाढवेल.
पाचवे आवर्तन पूर्ण केल्यानंतर ते चंद्राच्या दिशेने जावे लागेल.
चंद्राच्या कक्षेत प्रवेश :
पृथ्वीभोवतीच्या कक्षेतील आवर्तनाप्रमाणेच ‘चंद्रयान-3 चंद्राभोवती चार वेळा प्रदक्षिणा घालेल आणि प्रत्येक वेळी चंद्राजवळ जाईल.
अखेरीस ते 100 किमी× 100 किलोमीटरच्या वर्तुळाकार कक्षेत पोहोचेल.
या टप्प्यावर लॅन्डर प्रोपलशन मॉड्युलपासून वेगळे होते आणि त्याची कक्षा बदलते. त्यानंतर लॅन्डरचे अलगद अवतरण प्रक्रिया सुरू होते.
चंद्रावर अवतरण :
पृथ्वीपासून चंद्रापर्यंतचा प्रवास सुमारे एक महिना लागण्याची अंदाज आहे .
23 ऑगस्ट रोजी ते चंद्रावर उतरणे अपेक्षित आहे.
चंद्रावर अवतरण केल्यावर ते एका चांद्र दिवसासाठी कार्य करेल
रोव्हर डिस्कव्हरी:
चंद्रयान-3 हे चंद्राच्या पृष्ठभागावर एक रोव्हर उतरवेल आणि चंद्राचा शोध घेण्याची क्षमता सिद्ध करेल.
रोव्हर त्याच्या स्थानाजवळ वैज्ञानिक प्रयोग करेल आणि चंद्राच्या वातावरणाबाबत मौल्यवान माहिती गोळा करेल.
काय माहिती मिळणार?
चंद्रयान-3च्या सहाय्याने चंद्राच्या पृष्ठभागाची रचना ,भूवैज्ञानिक वैशिष्ट्ये आणि इतर माहिती मिळवली जाणार आहे.
चंद्राची आवरणाशीला, भूगर्भातील हालचाली, पृष्ठभागावरील प्लाझमाचे प्रमाण, चंद्रपूरृष्टातील रासायनिक मूलद्रव्य यांचा अभ्यास केला जाणार आहे.
वैशिष्ट्ये:-
‘चंद्रयान-3 ‘चंद्रापर्यंतचा प्रवास 41 दिवसांचा
चंद्रयान -3 चे 23 ऑगस्टला संध्याकाळी 5 वाजून 47 मिनिटांनी चंद्रावर अलगत अवतरण
इस्रोच्या या मोहिमेमुळे भारत, अमेरिका, सोव्हिएत रशिया आणि चीनची बरोबरी साधेल.
विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांच्या माहितीनुसार मोहिमेचा खर्च 600 कोटी रुपये.
दोन दशकातील प्रवास:-
15 ऑगस्ट 2003 : तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी भारताच्या चंद्रयान मोहिमेची घोषणा केली.
22 ऑक्टोबर 2008 : श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून चंद्रयान एक अवकाशात झेपावले. पीएसएलव्ही- सी 11 या प्रक्षेपकाच्या साहाय्याने या यानाचे प्रक्षेपण करण्यात आले.
8 नोव्हेंबर 2008 : चंद्रयान -1 ने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला.
14 नोव्हेंबर 2008: चंद्रयान -1 हे ऑर्बिटरपासून वेगळे झाले आणि नियंत्रित पद्धतीने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर धडकले. चंद्राच्या पृष्ठभागावर पाण्याच्या रेणूंच्या उपस्थितीची पुष्टी करण्यासाठी हे यान उतरविण्यात आले.
28 ऑगस्ट 2009 : इस्रोच्या शास्त्रज्ञांनी या अंतराळ यानाचा संपर्क तुटल्याचे घोषित केल्यानंतर या मोहिमेचा अखेर अंत झाला.
22 जुलै 2019 : श्रीहरीकोटा येथील अंतराळ केंद्रावरून चंद्रयान-2 चे प्रक्षेपण करण्यात आले. ‘एलव्हीएम-3 एम-1’ या प्रक्षेपकाच्या सहाय्याने हे यान अंतराळात पाठविण्यात आले.
20 ऑगस्ट 2019: ‘चंद्रयान-2’ चा चंद्राच्या ध्रुवीय कक्षेत प्रवेश
2 सप्टेंबर 2019 : चंद्राच्या ध्रुवीय कक्षेत 100 किलोमीटरवर चंद्राभोवती फिरताना विक्रम लँडर वेगळे झाले. तथापि चंद्राच्या पृष्ठभागापासून 2.1 किलोमीटर उंचीवर लँडरशी इस्रोच्या शास्त्रज्ञांचा संपर्क तुटला. हे यान कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली.
14 जुलै 2023: श्रीहरीकोटा येथील अंतराळ केंद्रावरून चंद्रयान – 3 चे प्रक्षेपण करण्यात आले.
23 ऑगस्ट 2023: इस्रो च्या शास्त्रज्ञांचे या दिवशी चंद्रयान-3 चे चंद्राच्या पृष्ठभागावर अलगद अवतरण करण्याचे नियोजन केले आहे. ज्यामुळे भारत हा पराक्रम साध्य करणाऱ्या बड्या राष्ट्रांमध्ये सामील होईल.
प्रक्षेपण केंद्रावर पुस्तकाचे प्रकाशन:
सतीश धवन अंतराळ केंद्रावरील प्रक्षेपण केंद्रावर राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते- लेखक विनोद मानकारा यांच्या नवीन पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
“Prism: The Ancestral Abode of Rainbow”असे शीर्षक असलेल्या या पुस्तकात विज्ञान विषयक लेख आहेत.
धवन अंतराळ केंद्रावर ऐतिहासिक प्रक्षेपणाची उलटगणती सुरू असताना इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी हे पुस्तक विक्रम साराभाई अंतराळ केंद्राचे संचालक एस. उन्नीकृष्णन नायर यांच्याकडे सुपूर्द करून प्रसिद्ध केले.
ISRO:- Indian Space Research Org.
(भारतीय अवकाश संशोधन संस्था)
स्थापना :- 15 ऑगस्ट 1969
संस्थापक : डॉ. विक्रम साराभाई
मुख्यालय:- बंगळुरू
अध्यक्ष:- एस. सोमनाथ (10 वे)


