Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

चीनची झेंग होहाओ पॅरिस ऑलिम्पिक मधील सर्वात कमी वयाची खेळाडू

  • Home
  • Current Affairs
  • Current Affairs 2024
  • चीनची झेंग होहाओ पॅरिस ऑलिम्पिक मधील सर्वात कमी वयाची खेळाडू
  • 11 वर्षे 11 महिने वय असलेली चीनची स्केटबोर्डर खेळाडू झेंग होहाओ पॅरिस ऑलिंपिकमध्ये पदार्पण करणार आहे.
  • 2024 च्या स्पर्धेतील ती सर्वात लहान खेळाडू असणार आहे.
  • आतापर्यंत सर्वात लहान खेळाडू ऑलिंपिकमध्ये खेळण्याचा विक्रम ग्रीक जिम्नॅस्ट दिमित्रिओस लाउंड्रास हिच्या नावावर होता.
  • 1986 च्या स्पर्धेत तिचे वय 10 वर्षे 218 दिवस असे होते.
  • झेंग 11 ऑगस्ट रोजी 12 वर्षांची होईल.

भारताकडून धिनिधी सर्वांत लहान खेळाडू

  • भारताकडून जलतरणपटू धिनिधी देसिंधू ही सर्वात लहान खेळाडू असणार आहे.
  • ती 14 वर्षांची आहे.
  • पॅरिस ऑलिंपिकमध्ये ती 200 मीटर – फ्रिस्टाईलमध्ये सहभागी होणार आहे.
  • ऑलिंपिक कोट्यातून ती पात्र ठरली आहे.

जिल इरविंग सर्वात वयस्क खेळाडू

  • कॅनडाची अश्वारोहक जिल इरविंग ही पॅरिस ऑलिंपिकमध्ये सहभागी होणारी सर्वात वयस्व खेळाडू असणार आहे.
  • 61 व्या वर्षी ती या पॅरिस ऑलिंपिकमध्ये पदार्पण करणार आहे.
  • झेंग होहाओपेक्षा तिचे वय पाच पटीने अधिक आहे.
  • मात्र 69 वर्षीय गी ऑस्ट्रेलियाची मेरी हाना जिल इरविंग हिला मागे टाकू शकतात.
  • 1996 च्या अॅटलांटा स्पर्धेपासून ती अश्वरोहणात सहभागी होत आहेत.
  • आताही त्यांचा संघात राखीव खेळाडू म्हणून समावेश आहे.
  • ऑस्ट्रेलिया संघातील एखादा खेळाडू जखमी झाला किंवा आजारी पडला तरच मेरी हाना खेळू शकतात.
  • आजतागायत ऑलम्पिक मध्ये सर्वाधिक वयस्क खेळाडू होण्याचा मान स्वीडनचे नेमबाज ऑस्कर स्वाहन यांच्या नावावर आहे.
  • 1920 मधील अँटवर्प ऑलिंपिकमध्ये ते 72 वर्षांचे होते.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *