● पंजाबमधील कृषी शास्त्रज्ञ प्रा. जगमोहन सिंह यांना २०२५ चा क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार देण्यात येणार आहे.
● 6 ऑगस्टला पुरस्कार वितरण होणार आहे
● जगमोहन सिंह हे शहीद भगतसिंह यांचे भाचे आहेत.
● आई बेबी अर्जित कौर यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील कार्यामुळे जगनमोहन हे एक वर्षांचे असतानाच आईसमवेत कारावास भोगला. त्यावेळी तेथे त्यांना नेताजींच्या आझाद हिंद सेनेतील सैनिकांचा सहवास मिळाला.
● आयआयटी खरगपूरमधून त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरची पदवी प्रथम क्रमांकाने संपादन केली.
● लुधियाना येथील पंजाब कृषी विद्यापीठांमध्ये ते इलेक्ट्रिकल इंजिनिअर विभागप्रमुख होते.
● बोअरवेलवरील स्वयंचलित इलेक्ट्रिकल स्टार्टर शोधून विकसित केला.
● जगमोहन सिंह यांनी शहीद भगतसिंग यांच्या नावाने संकोतस्थळ व वेबसीरिज निर्माण करून भगतसिंह व त्यांच्या सहकाऱ्यांची मूळ कागदपत्रे शोधून काढली.