जॉर्ज सोरोस, लिओनेल मेस्सीसह 19 जणांना अमेरिकेचा सर्वोच्च पुरस्कार प्रदान
- अमेरिकेचेमावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी 19 व्यक्तींना अमेरिकेच्या सरकारकडून प्रेसिडेन्शिअल मेडल ऑफ फ्रिडम हा अमेरिकेचा सर्वोच्च सन्मान देण्यात आला.
- राजकारण, क्रीडा, मनोरंजन, नागरीहक्क, विज्ञान इ क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना हा सन्मान देण्यात आला आहे.
- यामध्येमाजी परराष्ट्र सचिव हिलरी क्लिंटन, भारतीय राजकारणात खळबळ उडवून देणारे जॉर्ज सोरोस यांचा समावेश आहे.
- भारताच्याराजकारणावर प्रभाव टाकण्याचे गंभीर आरोप सोरोस यांच्यावर झाले आहेत.
- चारपदके मरणोत्तर देण्यात आली आहेत. यात मिशिगनचे माजी गव्हर्नर जॉर्ज डब्ल्यू. रोमनी, माजी ॲटर्नी जनरल आणि सिनेटर रॉबर्ट एफ. केनेडी, माजी संरक्षण सचिव ऍश कार्टर आणि मिसिसिपी फ्रीडम डेमोक्रॅटिक पार्टीचे संस्थापक आणि 1965 च्या मतदान हक्क कायद्याचे संस्थापक फॅनी लू हॅमर यांचा समावेश आहे.
- जगप्रसिद्धफुटबॉलपटू लिओनेल मेस्सीला देखील या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
- माजीबास्केटबॉल दिग्गज आणि उद्योगपती इर्विन मॅजिक जॉन्सन, अभिनेता मायकेल जे. फॉक्स, संवर्धनवादी जेन गुडॉल, व्होग मासिकाच्या दीर्घकाळ संपादक-इन-चीफ ॲना विंटूर, अमेरिकन फॅशन डिझायनर राल्फ लॉरेन, अमेरिकन फिल्म इन्स्टिट्यूटचे संस्थापक जॉर्ज स्टीव्हन्स ज्युनियर, उद्योजक टिम गिल आणि कार्लाइल ग्रुप ग्लोबल इन्व्हेस्टमेंट फर्मचे सह-संस्थापक. डेव्हिड रुबेन्स्टाईन यांचाही यात समावेश आहे.
जगातील सर्वात मोठे मेट्रो रेल्वे सेवेचे जाळे असलेला भारत बनला जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश
- देशातीलमेट्रो रेल्वे सेवा व्यवस्थेने भारतातील प्रवासी दळणवळण व्यवस्थेचा कायापालट केला आहे.
- आजमितीलादेशभरातील 11 राज्ये आणि 23 शहरांमध्ये 1,000 किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर मेट्रो रेल्वे सेवेचे जाळे विस्तारले आहे.
- इतक्यामोठ्या विस्तारासह भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे मेट्रो रेल्वे सेवा जाळे असलेला देश बनला आहे.
- पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी 5 जानेवारी 2025 रोजी भारतातील मेट्रो रेल्वे सेवा जाळ्याचा विस्तार करण्याच्या आणि त्याला अधिक मजबूत आणि प्रगत बनवण्याच्या दिशेने एक मोठा टप्पा पार केला.
- पंतप्रधानांनीदिल्ली-गाझियाबाद – मेरठ नमो भारत कॉरिडॉरच्या 13 किलोमीटर लांबीच्या मार्गाचे उद्घाटन केले.
- इतक्यामोठ्या विस्तारातून भारताने मेट्रो रेल्वे प्रकल्पांच्या बाबतीत 2022 मधील जपानच्या कामगिरीला मागे टाकले आहे.
- सध्याकार्यान्वित असलेल्या मेट्रो रेल्वे सेवा जाळ्याच्या लांबीच्या बाबतीत भारत जागतिक पातळीवर तिसऱ्या स्थानावर पोहचला असून, आता भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे मेट्रो रेल्वे सेवा जाळे असलेला देश बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.
‘अक्षय‘ व ‘अमूल्य‘ जहाजांचे जलावतरण
- गोवाशिपयार्डने भारतीय तटरक्षक दलासाठी ‘अक्षय’ आणि ‘अमूल्य’ या दोन जलद गस्ती जहाजांचे जलावतरण केले.
- याजहाजांमध्ये 65% स्वदेशी साहित्याचा वापर केला गेला आहे, ज्यामुळे देशाच्या समुद्री संरक्षण क्षमतेला बळकटी मिळणार आहे.
- याजहाजातील गिअर बॉक्स हे भारतीय बनावटीचे असून त्याचा पहील्यांदाच वापर करण्यात येत आहे.
- संरक्षणखात्याचे सचिव संजय कुमार यांच्या पत्नी वंदना अग्रवाल यांच्या हस्ते जलावतरण करण्यात आले.
पत्रकार दिन
- 6 जानेवारीहा दिवस महाराष्ट्रात ‘मराठी पत्रकार दिन’ म्हणून साजरा केला जातो. याचे श्रेय जाते बाळशास्त्री जांभेकर यांना, ज्यांनी 1832 साली ‘दर्पण’ हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू करून मराठी पत्रकारितेचा पाया घातला.
- बाळशास्त्रीजांभेकर यांचे योगदान मराठी पत्रकारिता आणि समाज सुधारणेत अमूल्य आहे.
- बाळशास्त्रीजांभेकर यांचा जन्म 6 जानेवारी 1812 रोजी कोकणातील एका सामान्य कुटुंबात झाला.
- केवळ34 वर्षांचे आयुष्य लाभलेल्या बाळशास्त्रींनी आपल्या छोट्या आयुष्यात समाज जागृतीचा मोठा वारसा निर्माण केला.
- त्यांचेव्यक्तिमत्त्व अभ्यासू, विद्वान आणि विचारशील होते. वयाच्या 20 व्या वर्षीच ते प्राध्यापक झाले आणि एल्फिन्स्टन महाविद्यालयात पहिले समर्पित व्याख्याता म्हणून नियुक्त झाले.
- 1832 सालीबाळशास्त्री जांभेकर यांनी ‘दर्पण’ हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र सुरू केले.हे वृत्तपत्र मराठी आणि इंग्रजी भाषांमध्ये प्रकाशित होत असे.
- मराठीलोकांना देशात चाललेल्या घडामोडी समजाव्यात आणि इंग्रजांना वृत्तपत्रातील आशय कळावा, यासाठी हे दुहेरी स्वरूप ठेवले गेले. ‘दर्पण’मध्ये दोन स्तंभ असत, एक मराठीत आणि दुसरा इंग्रजीत.
- ‘दर्पण’चापहिला अंक 6 जानेवारी 1832 रोजी प्रसिद्ध झाला. हे वृत्तपत्र साडेआठ वर्षे चालले आणि त्याचा शेवटचा अंक जुलै 1840 मध्ये प्रकाशित झाला.
- ब्रिटिशराजवटीत चालवलेल्या या वृत्तपत्राने अनेक अडचणींचा सामना केला, परंतु तरीही आपल्या उद्दिष्टांवर ठाम राहिले.
- बाळशास्त्रीजांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 रोजी सुरू केलेल्या ‘दर्पण’मुळे मराठी पत्रकारितेचा इतिहास घडला.
- त्यांच्यास्मृतींना वंदन म्हणून हा दिवस ‘मराठी पत्रकार दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यांच्या योगदानाचा आदर करण्यासाठी हा दिवस प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाचा आहे.