राष्ट्रीय क्रीडा दिन
- 2012 पासून, दरवर्षी 29 ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो.
- या दिवशी महान खेळाडू ध्यानचंद यांचा जन्म झाला होता.
- मेजर ध्यानचंद यांना हॉकीचे जादूगार म्हटले जाते.
- आपल्या 22 वर्षांच्या कारकिर्दीत 400 हून अधिक गोल करणाऱ्या या महान खेळाडूच्या स्मरणार्थ भारत सरकारने 2012 पासून त्यांच्या जयंतीदिनी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्याची घोषणा केली होती.
- 1956 मध्ये त्यांना देशाचा तिसरा सर्वोच्च सन्मान पद्मभूषण देण्यात आला होता.
- हा दिवस महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांची जयंती आहे. त्यांचा जन्म 1905 मध्ये अलाहाबादच्या राजपूत कुटुंबात झाला होता.
- वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत ध्यानचंद सैन्यात दाखल झाले आणि सैन्यातच हॉकी खेळू लागले.
- हॉकीच्या जादूगाराने देशाला अनेक नाव मिळवून दिले.
- ध्यानचंद हे 1928, 1932 आणि 1936 च्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय हॉकी संघाचा भाग होते. 22 वर्षांच्या कारकिर्दीत 400 हून अधिक गोल केले.
क्रीडा दिनाचे महत्त्व
- दरवर्षी राष्ट्रीय क्रीडा दिनी, भारताचे राष्ट्रपती अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार आणि मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार यांसारखे क्रीडा संबंधित सर्व पुरस्कार प्रदान करतात ज्यांनी त्यांच्या संबंधित खेळांमध्ये देशाला अभिमान मिळवून दिला आहे.
- 2018 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेली खेलो इंडिया चळवळ ही गेल्या काही वर्षांत सरकारने या दिवशी सुरू केलेल्या क्रीडा उपक्रमांपैकी एक आहे.
- या दिवशी देशभरात विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. अनेक महाविद्यालये, शाळा आणि कार्यालये या दिवसाचे महत्त्व लक्षात घेऊन चर्चासत्रे आणि खेळांचे आयोजन करतात.
रेल्वे बोर्डाच्या सीईओपदी प्रथमच दलित अधिकारी
- भारतीय रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून रेल्वे मंत्रालयाने सतीशकुमार यांची नियुक्ती केली.
- सतीशकुमार हे रेल्वे बोर्डाच्या 119 वर्षांच्या इतिहासातील अध्यक्षपदी विराजमान होणारे पहिले दलित अधिकारी आहेत.
- केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने (एसीसी) सतीशकुमार यांच्या रेल्वे बोर्डाच्या अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्तीला हिरवा कंदील दाखविला.
- रेल्वेमध्ये तीन दशकांहून अधिक काळ सेवेचा त्यांना अनुभव आहे.
- याआधी सतीशकुमार यांनी रेल्वे महाव्यवस्थापक व अनेक उच्च पदांवर काम केले आहे. सतीशकुमार आता रेल्वे बोर्डाच्या विद्यमान सीईओ जया वर्मा सिन्हा यांची जागा घेतील.
- वर्षभरापूर्वी रेल्वे बोर्डाच्या सीईओ बनणाऱ्या सिन्हा या पहिल्या महिला ठरल्या होत्या.त्या 31 रोजी ऑगस्ट निवृत्त होत आहेत.
- सतीशकुमार यांची नियुक्ती रविवारपासून (एक सप्टेंबर) किंवा त्यानंतर रुजू झाल्यापासून त्यांच्या निवृत्तीपर्यंत असेल.
- सतीशकुमार यांनी दाट धुक्यात मार्गक्रमण करताना रेल्वेगाड्यांना सुरक्षित ठेवणाऱ्या उपकरणांवर केलेले काम लक्षणीय आहे.
- या उपकरणांमुळे हिवाळ्याच्या महिन्यांत विशेषतः उत्तर-मध्य भारतात रेल्वे गाड्यांना धुक्यामुळे निर्माण होणारे धोके लक्षणीयरीत्या कमी होतात.
- सतीशकुमार हे 1986 च्या तुकडीचे इंडियन रेल्वे सर्व्हिस ऑफ मेकॅनिकल इंजिनीअर्स (आयआरएसएमई) अधिकारी आहेत.
‘जनधन‘ योजनेला दहा वर्षे पूर्ण
- जगभरातील सर्वांत मोठी सर्वसमावेशक आर्थिक योजना असा नावलौकिक प्राप्त केलेल्या प्रधानमंत्री जनधन योजनेला 28 ऑगस्ट 2024 रोजी दहा वर्षे पूर्ण झाली आहेत.
- ‘या योजनेद्वारे असंघटित कामगार, महिला, ग्रामीण भागांतील बँकिंग व्यवस्थेत न येऊ शकलेले अशा सर्वांना देशाच्या मुख्य आर्थिक प्रवाहात आणले गेले.
- ‘पीएमजेडीवाय’ या संक्षिप्त नावाने अल्पावधीतच प्रधानमंत्री जनधन योजना लोकप्रिय झाली.
- सर्वसमावेशक आर्थिक विकासासाठी राष्ट्रीय मोहीम असे या योजनेचे स्वरूप झाले आहे. यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आर्थिक उभारी मिळाली आहे असे अर्थमंत्र्यांनी नमूद केले.
जनधन योजना
- 28 ऑगस्ट 2014 रोजी योजनेला सुरुवात
- ग्रामीण व निमशहरी भागांत 67 टक्के बँक खाती उघडली गेली.
- महिलांकडून यापैकी 55 टक्के खाती उघडण्यात आली आहेत.
- जनधन-मोबाइल-आधार (जॅम) या त्रयीमुळे प्रत्येक नागरिकाला बँकिंग सुविधा विनासायास उपलब्ध होऊ शकल्या.
- केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांपासून मिळणारे लाभ थेट लाभाथ्यांच्या बँक खात्यांत हस्तांतरित होऊ शकले.
- ही योजना जेव्हा सुरू झाली तेव्हा मार्च 2015 मध्ये खाती 67 कोटी होती. ती आता 53.14 कोटींवर पोहचली.
खगोलशास्त्र, खगोलभौतिकी ऑलम्पियाड मध्ये भारताला पाच पदके
- ब्राझीलमध्ये झालेल्या 17 व्या खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाडमध्ये भारतीय संघाने 1 सुवर्ण आणि 4 रौप्य अशी एकूण पाच पदके पटकाविली.
- पदकतालिकेत भारतीय संघ 8 व्या स्थानी राहिला. विजेत्या चमूमध्ये पुण्यातील दोन विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
- ब्राझीलमधील रिओ द जानेरिओ येथे 17 ते 26 ऑगस्ट दरम्यान ही स्पर्धा झाली.
- त्यात सहभागी झालेल्या भारतीय संघातील पाचही विद्यार्थ्यांनी पदके न मिळवली.
- त्यात बंगळुरूच्या दक्ष तायालियाने सुवर्ण, पुण्याच्या आयुष कुठारी, सानिध्य सराफ, उत्तर प्रदेशातील पाणिनी, हैदराबाद येथील बानिव्रत माजी यांनी रौप्यपदक मिळवले.
- आयआयटी इंदूर येथील प्रा. भार्गव वैद्य, होमी भाभा विज्ञान . शिक्षण संस्थेतील प्रीतेश रणदिवे, प्रा. अर्णब भट्टाचार्य, डॉ. वैभव पंत, अक्षक सिंघल, यश मेहता यांनी मार्गदर्शन केले.
- ऑलिम्पियाडचे विद्यमान अध्यक्ष म्हणून प्रा. अनिकेत सुळे उपस्थित होते.
- यावर्षी 52 देशांतील 232 विद्यार्थ्यांचा ऑलिम्पियाडमध्ये सहभाग होता.
- इराणने सर्वाधिक पाच सुवर्णपदके मिळवली. अमेरिकेने तीन, रोमानिया, दक्षिण कोरिया, सिंगापूर, स्लोवेनिया, कॅनडा यांनी प्रत्येकी दोन सुवर्णपदके मिळवली.
- ऑलिम्पियाडमध्ये थिअरी, निरीक्षणे आणि विदा विश्लेषण अशा तीन घटकांचा समावेश होता.
पुढील वर्षी मुंबईत आयोजन
- पुढील वर्षी ऑगस्टमध्ये खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाडचे आयोजन मुंबईमध्ये करण्यात येणार आहे. त्यामुळे होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राचे संचालक प्रा. अर्णब भट्टाचार्य यांनी आयोजनासाठीचा ध्वज स्वीकारला.