जपान सरकारने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शासकीय अतिथी (स्टेट गेस्ट) हा विशेष दर्जा देऊन आमंत्रित केले आहे. फडणवीस यांनी निमंत्रणाचा स्वीकार केला असून ते 20 ऑगस्ट पासून जपान दौऱ्यावर जात आहेत. यापूर्वी 2013 साली गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर राज्य पातळीवरील एखाद्या नेत्याला हा मान मिळण्याची ही पहिलीच घटना आहे. फडणवीस या दौऱ्यात जपानचे अर्थमंत्री, परराष्ट्र व्यवहार मंत्री ,व्यापार मंत्री व पर्यटन मंत्री यांच्याशी चर्चा करतील तसेच जायका, जेट्रो यासारख्या आंतरराष्ट्रीय वित्त संस्थांचे उच्च सदस्य अधिकारी विदेशी गुंतवणूक तसेच जपान इंडिया असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांबरोबर त्यांच्या अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक होणार आहेत.


