बिहारच्या गान कोकिळा शारदा सिन्हा यांचे निधन
- बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचे वयाच्या 72 व्या वर्षी कर्करोगाने निधन झाले.
- त्यांनी भोजपुरी आणि मैथिली लोकगीतातून लोकप्रियता मिळवली.
- गेल्या पाच दशकांपासून शारदा सिन्हा यांनी उत्तर भारतीय संगीत क्षेत्रात योगदान दिले आणि त्याबद्दल त्यांना पद्मश्री (1991) पद्मभूषण (2018), लोकगीतासाठीचा संगीत नाटक अकादमी (2000) यासह विविध पुरस्काराने गौरविण्यात आले तसेच त्यांना बिहार सरकारने देखील सन्मानित केले होते गायनाबरोबरच त्या विविध संस्कृती कार्यक्रमातही सक्रिय सहभागी होत्या.
जपानने अवकाशात सोडला पहिला लाकडी उपग्रह
- जपानने ‘लिग्नोसॅट’ हा जगातील पहिला लाकडी उपग्रह अवकाशात सोडला आहे.
- होनोकी लाकडापासून बनवलेला हा उपग्रह सहा महिने पृथ्वीभोवती फिरणार आहे.
- भविष्यातील अंतराळ मोहिमांमध्ये लाकडाचा वापर व्यवहार्य ठरू शकतो का, याची चाचणी यातून होणार आहे.
- लाकडाचा वापर केलेला हा उपग्रह क्योटो विद्यापीठाने विकसित केला आहे.
- याचे वजन 900 ग्रॅम आहे.
- ‘स्पेसएक्स’च्या मोहिमेतून ‘लिंगोसॅट’ आंतरराष्ट्रीय अवकाश ‘स्थानकाकडे नुकताच पाठविण्यात आला.
- तेथे पोहोचल्यानंतर ‘लिंगोसॅट’ हा पृथ्वीच्या कक्षेत स्थापित केला जाईल.
- अंतराळातील कठीण परिस्थितीत लाकडाच्या टिकाऊपणाची चाचणी तेथे सहा महिने होणार आहे.
- या उपग्रहाच्या लाकडी चौकट ही मंगोलियन लाकडापासून तयार केली आहे.
- जपानच्या पारंपरिक पद्धतीनुसार ही चौकट तयार केली असून त्यात स्क्रू आणि गोंद वापरण्यात येत नाही.
- उपग्रह निर्मितीचा हा अभिनव प्रयोग मानण्यात येत आहे.
- अवकाश तंत्रज्ञानात काही निवडक धातूंऐवजी लाकडाचा वापर करणे शक्य होऊ शकते, असा संशोधकांना विश्वास आहे.
अल्पवयीनांसाठी ऑस्ट्रेलियात सोशल मीडिया बंद
- युवा पिढीचे मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी ऑस्ट्रेलियात अनेक उपाय योजले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे 16 वर्षांखालील मुला-मुलींना सोशल मीडियाचा वापर करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
- तशी घोषणा पंतप्रधान अँथोनी अल्बानिज यांनी केली.
- सोशल मीडिया व्यासपीठावरील कंपन्यांनी नवी नियमावली जाहीर करावी अथवा त्यांना संभाव्य दंडाला सामोरे जावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
पुण्यात कोळ्याच्या नवीन प्रजातीचा शोध
- उडी मारणाऱ्या कोळ्याच्या ‘ओकिनाविसियस टेकडी’ या नवीन प्रजातीचा शोध पुण्यातील बाणेर टेकडीवर लागला आहे.
- या कोळ्याचा शोध टेकडीवर लागल्यामुळे कोळ्याच्या नावात टेकडी हा शब्द टाकण्यात आल्याचे संशोधकांनी सांगितले.
- या संशोधनाने पुण्याच्या जैवविविधतेच्या संपत्तीला नव्याने अधोरेखित केले आहे.
- विज्ञान आणि संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा शोध हा’एमआयटी-डब्ल्यूपीयू’च्या संशोधकांनी लावला आहे.
- या शोधात ‘एमआयटी-डब्ल्यूपीयू’ येथील – पर्यावरणशास्त्रातील एमएस्सीचा इ – विद्यार्थी अथर्व कुलकर्णी आणि क केरळमधील ख्राइस्ट कॉलेजचा ऋषिकेश त्रिपाठी यांनी प्रमुख भूमिका बजावली आहे.
- बाणेर हिलवरील ‘फायकस’ आणि ‘प्लुमेरिया’ या झाडांवर कोळ्याचा अभ्यास केला. काही महिन्यांनंतर त्याला नवीन प्रजाती म्हणून मान्यता दिली.