अणुशास्त्रज्ञ डॉक्टर राजगोपाल चिदंबरम यांचे निधन
- देशालाआण्विकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरलेल्या ‘पोखरण 1’ आणि ‘पोखरण 2’ अणुचाचण्यांमध्ये मोलाची भूमिका बजावणारे प्रख्यात अणुशास्त्रज्ञ, क्रिस्टलोग्राफर डॉ. राजगोपाल चिदम्बरम यांचे 89 व्या वर्षी निधन झाले.
अल्प परिचय:
- डॉ. चिदम्बरमयांनी भाभा अणुसंशोधन केंद्राचे (बीएआरसी) संचालक, अणुऊर्जा आयोगाच्या (एईसी) अध्यक्ष आणि अणुऊर्जा विभागाच्या (डीएई) सचिव पदाची धुरा समर्थपणे सांभळली होती.
- ते1994 ते 95 या कालावधीत आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीच्या (आयएईए) गव्हर्नर्स मंडळाचे अध्यक्ष होते.
- भारतसरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते.
- डॉ. चिदम्बरमयांनी देशाच्या अण्वस्त्र कार्यक्रमात महत्त्वाची भूमिका बजावताना 1975 मधील ‘पोखरण 1’ आणि 1998 मधील ‘पोखरण 2’ या चाचण्यांमध्ये समन्वयकाची भूमिका बजावली होती.
- त्यांना1975 मध्ये पद्मश्री आणि 1999 मध्ये पद्मविभूषण देऊन सन्मानित करण्यात आले होते.
डॉ. चिदम्बरम यांना मिळालेले इतर पुरस्कार
- 1991- बंगळुरूमधीलइंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचा प्रतिष्ठित माजी विद्यार्थी पुरस्कार
- 1998 – इंडियनसायन्स काँग्रेस असोसिएशनचा सी. व्ही. रमण जन्मशताब्दी पुरस्कार
- 1998 – लोकमान्यटिळक पुरस्कार
- 1999 – वीरसावरकर पुरस्कार
- 1999 – दादाभाईनौरोजी मिलेनियम पुरस्कार
- 2002 – भारतीयराष्ट्रीय विज्ञान अकादमीचे मेघनाद साहा पुरस्कार
- 2003 – श्रीचंद्रशेखरेंद्र सरस्वती राष्ट्रीय प्रतिष्ठित पुरस्कार
- 2006 – इंडियनन्युक्लिअर सोसायटीचा होमी भाभा जीवनगौरव पुरस्कार
- 2009 – इंडियननॅशनल अॅकॅडमी ऑफ इंजिनीअरिंगचा अभियांत्रिकीमधील जीवनगौरव योगदान पुरस्कार
- 2013 – भारतीयराष्ट्रीय विज्ञान अकादमीकडून सी. व्ही. रमण पुरस्कार
- 2014 – ऊर्जाउपयोगिता परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार
जगातील सर्वात वयोवृद्ध महिलेचे निधन
- जगातीलसर्वात वृद्ध महिला टोमिको इतुका यांचे वयाच्या 116 व्या वर्षी जपानमध्ये निधन झाले.
- ‘गिनीजवर्ल्ड रेकॉर्ड’ नुसार, इत्सुका ही जगातील सर्वात वृद्ध महिला होती.
- इतुकायांचे 29 डिसेंबर रोजी मध्य जपानमधील ह्योगो प्रांतातील आशिया येथील केअर होममध्ये निधन झाले.
- दरम्यान, झेरोन्टोलॉजीरिसर्च ग्रुपनुसार जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती आता ब्राझीलच्या नन इनाह कॅनाबारो लुकास असून त्या 116 वर्षांच्या आहेत.
जयंत खोब्रागडे पोलंडमधील भारताचे राजदूत
- पोलंडमधीलभारताचे राजदूत म्हणून जयंत खोब्रागडे यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा परराष्ट्र मंत्रालयाने केली.
- भारतीयपरराष्ट्र सेवेत 1995 मध्ये दाखल झालेले जयंत खोब्रागडे सध्या जकार्ता, आसियानमध्ये भारताचे राजदूत आहेत.
- तेलवकरच नवी जबाबदारी स्वीकारतील.
- खोब्रागडेयांनी यापूर्वी मॉस्को (रशिया), अलमाटी (कझाकस्तान), मद्रिद (स्पेन) येथील भारतीय दूतावासांमध्येतसेच किर्गिझस्तानमध्ये राजदूत म्हणून काम केले आहे.
- खोब्रागडेयांनी पुणे अभियांत्रिकी महाविद्यालयातून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी संपादन केली आहे.
फोर–जी सेवेत राज्यात ‘वी‘ चा प्रथम क्रमांक
- दूरसंचारकंपनी, व्होडाफोन-आयडियाने (वी) फोर- जी सेवांमध्ये राज्यात सर्वांत जास्त डाउनलोड स्पीड, व्हॉइस अॅप आणि गेमिंगबाबतच्या ग्राहक अनुभवाच्या निकषांवर आधारित क्रमवारीत प्रथम क्रमांक मिळवला आहे.
- ग्राहकानुभवांचेपरीक्षण करणाऱ्या, ‘ओपनसिग्नल’च्या नोव्हेंबर 2024 साठीच्या फोर-जी नेटवर्क अनुभव अहवालामध्ये ‘वी’ची विशेष दखल घेण्यात आली आहे.
- याअहवालानुसार, राज्यात सर्वत्र नेटवर्कची कामगिरी वाढवण्यासाठी ‘वी’कडून सातत्याने केल्या जात असलेल्या प्रयत्नांमुळे हे यश मिळाले आहे.
- यावर्षीच्या एप्रिल महिन्यात ‘वी’ने ‘एफपीओ’मार्फत 18 हजार कोटी रुपये उभारले असून, त्या भांडवलाच्या साह्याने देशभरात फोर-जी नेटवर्क वाढवण्यात येत आहे.
- याचप्रयत्नांचा एक भाग म्हणून कंपनीने राज्यातील जवळपास 6500 फोर-जी केंद्रे अद्ययावत केली असून, कनेक्टिविटीमध्ये सुधारणा घडवून आणली आहे. त्यामुळे इनडोअर कव्हरेज आणि डेटा स्पीडदेखील सुधारला आहे.