भारतीय वंशाचे अजय बंगा यांची जागतिक बँकेचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
हे पद भूषविणारे बंगा हे भारतीय वंशाचे पहिलेच व्यक्ती ठरणार आहेत.
बंगा यांचा कार्यकाळ 2 जून 2023 पासून सुरू होणार असून, ते पाच वर्षे या पदावर राहतील.
अजय सिंह बंगा :
जन्म : 10 नोव्हेंबर 1959, पुणे
त्यांचे कुटुंब मूळचे पंजाब मधील जालंदर या ठिकाणचे
दिल्ली युनिव्हर्सिटीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून अर्थशास्त्रात बीए झाल्यानंतर त्यांनी अहमदाबादच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधून एमबीए केले.
नेस्ले आणि पेप्सीको कंपन्यांमध्ये दीर्घकाळ विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्यानंतर अजय बंगा यांना पेप्सीको कंपनीला भारतीय बाजारपेठेत उतरविण्यात यश आले.
बंगा हे १२ एप्रिल २०१० रोजी मास्टरकार्डच्या सीईओपदी नियुक्त झाले होते
2016 या वर्षी बंगा यांना पद्मश्री पुरस्काराने गौवरविण्यात आले होते
जागतिक बँक :–
जागतिक बँक ही एक आंतरराष्ट्रीय वित्त आणि पतपुरवठा संस्था आहे.
स्थापना : 1944
मुख्यालय : वॉशिंग्टन डी.सी.
सदस्य संख्या : 189
जागतिक प्रमुख बँकेची उद्दिष्टे
सरकारांचे सबलीकरण व सरकारी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण
अर्थव्यवस्थांचा विकास
भ्रष्टाचार निर्मूलन
गरीबी हटाव
संशोधन व शिक्षण
शिक्षणासाठी जागतिक बँक विषेश परिश्रम घेते. या साठी आंतरजालाधारित प्रशिक्षण व इतर पर्यायांचा उपयोग केला जात आहे.
सध्याचे अध्यक्ष डेव्हिड मालपास. 3 जून नंतर अजय बंगा हे अध्यक्ष असतील


