Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

जीमेक्स- 24 सरावाला सुरवात

  • भारत आणि जपान देशांच्या नौदलांच्या ‘जीमेक्स-24’ या सागरी सरावाला जपानमध्ये सुरुवात झाली.
  • याच अनुषंगाने भारतीय नौदलाचे स्वदेशी ‘फ्रिगेट आयएनएस शिवालिक’ ही युद्धनौका जपानमधील योकोसुका येथे दाखल झाली.
  • या द्वीपक्षीय सरावाच्या माध्यमातून दोन्ही देशांच्या नौदलांमध्ये विविध युद्धनीतींचा सराव, त्याचबरोबर सागरी सुरक्षेच्या अनुषंगाने उपयुक्त कौशल्यांचे देवाण-घेवाण होणार आहे.
  • भारत आणि जपान या देशांच्या नौदलांमध्ये होणाऱ्या ‘जीमेक्स’ या सरावाची 2024 ची एकूणच आठवी आवृत्ती असून, याची पहिली आवृत्ती 2012 मध्ये पार पडली होती.
  • या सरावामध्ये बंदर (हार्बर) आणि सागरी दोन्ही टप्प्यांचा समावेश असेल.
  • हार्बर टप्यात व्यावसायिक, क्रीडा आणि सामाजिक संवादांचा समावेश असेल. तर सागरी टप्प्यात दोन्ही नौदल संयुक्तपणे युद्धकौशल्य सादर करतील.
  • त्याचबरोबर हवाई क्षेत्रातील जटिल ऑपरेशन्सद्वारे त्यांची आंतरकार्यक्षमता वाढविण्यासाठी सराव करतील.
  • सागरी सुरक्षेच्या वाढत्या प्रश्नाला उत्तर देण्याकरिता ‘जीमेक्स- 24’ सराव दोन्ही देशांच्या नौदलांना एकमेकांच्या सर्वोत्तम पद्धतींमधून शिकण्याची संधी प्रदान करते.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *