हिंदुस्थानी शास्त्रीय वादक म्हणून लौकिक मिळवलेले आणि फ्युजन संगीतातील प्रयोगात रमलेले प्रसिद्ध पखवाजवादक पंडित भवानी शंकर यांचे वयाच्या 69 व्या वर्षी निधन झाले.
अधिक माहिती
● वयाच्या पाचव्या वर्षापासून वादन… भवानीशंकर यांचे घराणे संगीताशी जोडले गेले होते. त्यांचे वडील बाबूलाल हे प्रख्यात कथक नर्तक होते.
● भवानी यांना मात्र पखवाज आणि तबला यांची ओढ होती.
● वयाच्या पाचव्या वर्षापासून त्यांनी तबला आणि पखवाज वादनाचे धडे घ्यायला सुरुवात केली.
● पखवाज वादन भारतातही लोकप्रिय व्हावे अशी त्यांची इच्छा होती .
● केवळ पखवाज आणि तबलाच नव्हे तर एकूण बारा वाद्य त्यांना वाजवता येत होती.
● त्यांनी पंडित शिवकुमार शर्मा, पंडित हरिप्रसाद चौरसिया, पंडित जसराज यांच्याबरोबर देश-विदेशात वादन केले होते.
फ्युजन संगीतातील प्रयोग
● फ्युजन प्रयोग हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचा आत्माही जपला पाहिजे आणि ऐकणाऱ्याच्या मनाचाही ठाव घेता आला पाहिजे यासाठी पखवाजचाताल आणि परदेशी सुरावट असे फ्युजन संगीतातील प्रयोग करण्यातही त्यांना अधिक रस होता
● पाश्चिमात्य संगीत, जॅस संगीत, चित्रपट संगीतातही त्यांनी फ्युजन चे प्रयोग केले.
● त्यांच्या या फ्युजन संगीतातील प्रयोगाची दखल लिमका बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि गिनीज बुक रेकॉर्डने घेतली.
● त्यांनी चित्रपट संगीतातही काम केले होते.
पुरस्कार
● भवानी शंकर यांना पखवाज वादनासाठी 2004 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या हस्ते संगीत नाटक आगादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.