Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

ज्येष्ठ लेखिका डॉ. मीना प्रभू यांचे निधन Dr Meena Prabhu Passes Away

Dr Meena Prabhu Passes Away

 ज्येष्ठ लेखिका डॉ. मीना प्रभू यांचे निधन

 

  • ओघवत्या शैलीतील प्रवासवर्णनपर लेखनातून मराठी वाचकांना देशोदेशीची सफर घडवून आणणाऱ्या आणि या लेखन प्रकाराला वाङ्मयीन प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या ज्येष्ठ लेखिका डॉ. मीना सुधाकर प्रभू यांचे वयाच्या 85 व्या वर्षी निधन झाले.
  • डॉ. मीना प्रभू यांचा जन्म 27 ऑगस्ट 1939 रोजी पुण्यात झाला.
  • बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस पदवी संपादन केल्यानंतर पुढील शिक्षण त्यांनी मुंबईत घेतले.
  • विवाहानंतर त्या इंग्लंडला गेल्या. तेथे त्यांनी अनेक वर्षे भूलतज्ज्ञ आणि जनरल प्रॅक्टिशनर म्हणून रुग्णसेवा केली.
  • वैद्यकीय क्षेत्रातील काम सुरू असताना त्यांनी मराठीत प्रवासवर्णनपर लेखनास सुरुवात केली. पुढे त्यांनी कादंबरी लेखन केले. त्यांचे कवितासंग्रहही प्रकाशित झाले.
  • ‘माझं लंडन’ हे त्यांचे पहिले पुस्तक.
  • दृष्टिहीन बांधवांसाठी हे पुस्तक ब्रेल लिपीमध्येही प्रकाशित करण्यात आले.
  • तत्कालीन संरक्षण मंत्री शरद पवार यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले होते.
  • मीना प्रभू यांनी गोवा येथील महिला साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते.
  • त्यांना दि. बा. मोकाशी पारितोषिक, गो. नी. दांडेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मृण्मयी पुरस्कार, न. चिं. केळकर पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
  • त्यांच्या अनेक पुस्तकांना महाराष्ट्र राज्य पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.
  • गेल्याच वर्षी महाराष्ट्र साहित्य परिषदेने मसाप जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला होता.

 

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *