ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक उत्तम कांबळे यांना कर्नाटक सरकारचा प्रसिद्ध कवी सिद्धलिंगय्या यांच्या नावाने देण्यात येणारा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. कर्नाटकातील साहित्य, कला, संस्कृती या क्षेत्रांमध्ये भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तींचा दरवर्षी पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. कर्नाटकातील असलेल्या आणि राज्याबाहेर राहून कर्तृत्व गाजविणाऱ्या व्यक्तींची यावर्षी प्रथमच पुरस्कारासाठी निवड केली आहे.
अधिक माहिती
● 31 जानेवारी रोजी कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते पाच लाख रुपये, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र अशा स्वरूपात पुरस्कार प्रदान त्यांना केला जाणार आहे.
● बंगळूर येथील रवींद्र कलाग्राम येथे 31 जानेवारी रोजी पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे.
● ज्येष्ठ साहित्यिक व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या अनेक कथा, कादंबऱ्या, कविता आणि आत्मकथन इ. एकूण 18 कलाकृतींचा कन्नड भाषेमध्ये अनुवाद करण्यात आलेला आहे.