झारखंडमध्ये आता 50 व्या वर्षीच निवृत्तिवेतन मिळणार आहे. “राज्यातील आदिवासी आणि दलितांना वयाची 50 वर्षे पूर्ण झाल्यावर निवृत्तिवेतनाचा (पेन्शन) लाभ मिळेल” अशी घोषणा मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी केली.
अधिक माहिती
• झारखंड मुक्ती मोर्चाच्या (जेएमएम) नेतृत्वाखालील सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त रांचीतील मुरादाबाद मैदानावर कार्यक्रम आयोजित केला होता.
• आदिवासी व दलितांना वयाची 50 वर्षे पूर्ण झाल्यावर निवृत्तिवेतनाचा लाभ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
• त्यांच्यामध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त आहे व त्यांना 60 वर्षांनंतर नोकऱ्या मिळत नाहीत.
• झारखंडची निर्मिती 2000 मध्ये झाल्यानंतर 20 वर्षांत केवळ 16 लाख लोकांना पेन्शनचा लाभ मिळाला होता.
• सोरेन सरकारने चार वर्षांत 36 लाख लोकांना पेन्शन दिली आहे. त्यात 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या वृद्ध व्यक्ती, 18 वर्षांवरील विधवा आणि शारीरिकदृष्ट्या दिव्यांगांचा समावेश आहे.