● टाइम्स हायर एज्युकेशनची आशिया क्रमवारी 2025 जाहीर करण्यात आली. त्यात पहिल्या पाचशे संस्थांमध्ये राज्यातील इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (आयसर पुणे) या चार उच्च शिक्षण संस्थांचा समावेश आहे.
● टाइम्स हायर एज्युकेशनतर्फे उच्च शिक्षण संस्थांची जागतिक क्रमवारी जाहीर करण्यात येते. त्याच धर्तीवर आशिया क्रमवारीही जाहीर करण्यात येते.
● यंदाच्या क्रमवारीत ३५ देशांतील ८५३ उच्च शिक्षण संस्थांचा समावेश आहे.
● क्रमवारीत चीनमधील सिंगूआ विद्यापीठाने अग्रस्थान, तर पेकिंग विद्यापीठाने द्वितीय, नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूरने तिसरे स्थान मिळवले आहे.
● क्रमवारीतील पहिल्या शंभर शिक्षण संस्थांमध्ये बंगळुरूची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ही देशातील एकमेव संस्था ३८व्या स्थानी आहे.
● राज्यातील इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीने २०१ ते २५० या गटात, सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाने २५१ ते ३०० या गटात, तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ३५१ ते ४००, आयसर पुणे ४०१ ते ५०० या गटात स्थान मिळवले.