नाशिक येथील दि न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूट या शैक्षणिक संस्थेच्या वतीने देण्यात येणारा अक्षय्य पुरस्कार ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांना जाहीर झाला आहे. महाकवी कालिदास कलामंदिरात 30 जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता पुरस्कार सोहळा होणार आहे.
अधिक माहिती
● दि न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचा सत्कार करण्यात येतो.
● पुरस्काराचे स्वरूप महावस्त्र, श्रीफळ, २५ हजार रुपये, सन्मानपत्र व स्मृतीचिन्ह असे आहे. डॉ. काकोडकर यांना संस्थेचे अध्यक्ष प्रकाश वैशंपायन यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.