Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

डॉ अभय बंग, डॉ. राणी बंग यांना ‘राजर्षी शाहू’ पुरस्कार – 2023 (DR. ABHAY BANG, DR. ‘RAJARSHI SHAHU’ AWARD TO RANI BANG – 2023)

  • Home
  • Current Affairs
  • डॉ अभय बंग, डॉ. राणी बंग यांना ‘राजर्षी शाहू’ पुरस्कार – 2023 (DR. ABHAY BANG, DR. ‘RAJARSHI SHAHU’ AWARD TO RANI BANG – 2023)
  • कोल्हापूर येथील राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट कडून देण्यात येणारा प्रतिष्ठेचा राजर्षी शाहू पुरस्कार जेष्ठ समाजसेवक डॉक्टर अभय बंग आणि डॉक्टर राणी बंग दांपत्याला  जाहीर झाला.
  • एक लाख रुपये रोख ,स्मृतीचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे .
  • या उभयंतांनी ग्रामीण आरोग्य ,बाल आरोग्य, स्त्रियांचे आरोग्य अशा विषयांमध्ये केलेल्या व्यापक कार्यासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे.
  • राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय सामाजिक काम करणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार जयंतीदिनी 26 जून रोजी दिला जातो.
  • याआधी व्ही. शांताराम ,कुसुमाग्रज, एनडी पाटील, शरद पवार ,डॉक्टर रघुनाथ माशेलकर , आशा भोसले,  गणपतराव आंधळकर, अण्णा हजारे, तात्याराव लहाने इत्यादींना हा पुरस्कार देण्यात आला आहे .
  • डॉक्टर बंग यांना वैद्यकीय शिक्षणाच्या दरम्यान विद्यापीठात व भारतात प्रथम स्थान, चार सुवर्णपदके तसेच डि.लीट उपाधीने गौरविण्यात आले आहेत.
  • त्यांचे ‘माझा साक्षात्कारी हृदयरोग’, ‘कोवळी पानगळ’,’ सेवाग्राम ते शोधग्राम’, साहित्य प्रसिद्ध आहेत.
  • तसेच डॉक्टर राणी बंग यांची ‘गोईन’,’ कानोसा’ इत्यादी ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत.
  • डॉक्टर अभय बंग व राणी बंग यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार देऊन सन्मानित केले गेले आहे.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *