- पुणे कृषिशास्त्रज्ञ आणि भारतीय कृषी संशोधन संस्थेचे माजी संचालक डॉ. एस. ए. पाटील यांचे वयाच्या 78 व्या वर्षी निधन झाले.
- डॉ. पाटील धारवाड कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू होते.
- डॉ. पाटील हे कृषी अध्यापन, संशोधन, विस्तार, विकास आणि प्रशासनाशी संबंधित पन्नास संस्थांमध्ये कार्यरत होते.
- त्यांनी कापूस, भुईमूग, सूर्यफूल आणि एरंड या पिकांच्या 16 संकरित आणि उच्च उत्पन्न देणाऱ्या जाती विकसित केल्या.
- त्यांनी विकसित केलेले कापसाचे ‘वरलक्ष्मी’ हे जगातील पहिले लांब धाग्याचे हायब्रीड वाण आहे.
- त्यांना आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार मिळाले होते.