Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

डॉ.मनमोहन सिंग यांचे निधन

डॉ.मनमोहन सिंग यांचे निधन

  • 90 च्या दशकात दिवाळखोरीच्या काठावर असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला सावरण्याबरोबरच उदार आर्थिक धोरणांद्वारे नवी उभारी देणारे द्रष्टे अर्थतज्ज्ञ माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले.
  • अमेरिकेबरोबर केलेला अणूकरार, माहितीचा अधिकार, मनरेगा, अन्नसुरक्षा कायदा अशा अनेक निर्णयांतून आपला कणखरपणा, दूरदृष्टी, सचोटी यांचे दर्शन घडवणारे म्हणून  डॉ. सिंग ओळखले जात.
  • देशाचे 14 वे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांची ओळख अर्थतज्ज्ञ, विचारवंत, आर्थिक सुधारणांचा नायक आणि विद्वान म्हणून होती.
  • प्रत्येक घटनेकडे, कार्याकडे उतावीळ होऊन न पाहता, त्यावर प्रतिक्रिया देताना ती पूर्ण विचारांती देण्यासाठी ते ओळखले जात.

अल्पचरित्र:

  • डॉ. मनमोहनसिंग यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी तत्कालीन पंजाब प्रांतातील गाह या गावात झाला
  • डॉ. सिंग यांनी तत्कालीन मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण 1948 मध्ये पंजाबमध्ये पूर्ण केले. पुढील शिक्षणासाठी ते ब्रिटनच्या केम्ब्रिज विद्यापीठात गेले. तिथे 1957 मध्ये त्यांनी अर्थशास्त्रात ऑनर्स पदवी प्रथम श्रेणीत प्राप्त केली.
  • 1962 मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठातून डॉ. मनमोहनसिंग यांनी डी. फिल ही पदव्युत्तर पदवी अर्थशास्त्र विषय घेऊन संपादन केली.
  • ऑक्सफर्ड विद्यापीठात असतानाच त्यांनी 1964 मध्येइंडियाज् एक्सपोर्ट ट्रेंड्स अँड प्रॉस्पेक्ट्स फॉर सेल्फ सस्टेन्ड ग्रोथया ग्रंथाचे लेखन केले
  • भारताच्या व्यापार धोरणावर डॉ. मनमोहनसिंग यांचे हे पहिले विश्लेषण मानले जाते.
  • डॉ. मनमोहनसिंग हेदिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सआणि पंजाब विद्यापीठ येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते.
  • यूएन ट्रेड अँड (यूएनसीटीएडी) डेव्हलपमेंटया संघटनेच्या सचिवालयात ते तीन वर्षे कार्यरत होते.
  • 1987 ते 1990 या काळात ते जिनिव्हा येथेसाउथ कमिशनमध्ये महासचिव म्हणून कार्यरत होते.
  • 1971 मध्ये डॉ. सिंग केंद्र सरकारमध्ये वाणिज्य मंत्रालयामध्ये आर्थिक सल्लागार.
  • 1972 मध्ये ते केंद्रीय अर्थ मंत्रालयात मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून कार्यरत होते.
  • डॉ. मनमोहनसिंग यांनी केंद्रीय अर्थ मंत्रालयाचे सचिव, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, पंतप्रधानांचे सल्लागार आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे (यूजीसी) अध्यक्ष अशी विविध महत्त्वाची पदे भूषविली.
  • 1991 ते 1996 या काळात ते देशाचे अर्थमंत्री होते.

पंतप्रधान(पहिली कारकीर्द 2004 ते 2009)

  • 2005 – राष्ट्रीय रोजगार हमी कायदा (एमजीनरेगा) देशभरात लागू केला. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचीसंकल्पना असलेली सुवर्ण चतुष्कोण ही महामार्ग योजना डॉ. सिंग यांनी पुढे सुरू ठेवली
  • डॉ. सिंग सरकारने विक्रीकर रद्दबातल ठरवून त्याजागी मूल्यवर्धित कर (व्हॅट) लागू केला.
  • माहितीचा अधिकार कायदा लागू झाला. 23 जून 2005 – राष्ट्रपतींनी विशेष आर्थिक क्षेत्र (एसईझेड) अधिनियम-2005ला मंजुरी दिली. हा अधिनियम 10 फेब्रुवारी 2006 रोजी विशेष आर्थिक क्षेत्र (एसईझेड) नियम 2006 म्हणून लागू झाला
  • या माध्यमातून वस्तूंची निर्मिती, निर्यात, मालाची साठवण आणि अन्य उद्योगांसाठी लागणारे परवाने आणि इतर सोयीसुविधा अधिक सुलभ करण्यात आल्या.
  • आरोग्य मिशन सुरू
  • 18 जुलै 2005 : भारतअमेरिका
  • आण्विक करार हा डॉ. मनमोहनसिंग यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीतील एक मोठा टप्पा ठरला. डॉ. सिंग आणि अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश यांच्या पुढाकाराने या कराराचा आरखडा तयार करण्यात आला होता. याअंतर्गत भारताने आपल्या नागरी आणि लष्करी आण्विक
  • आस्थापना वेगवेगळ्या ठेवण्याचे मान्य केले; तसेच भारतातील नागरी आण्विक आस्थापना आंतरराष्ट्रीय आण्विक ऊर्जा संस्थेच्या देखरेखीखाली ठेवण्यासही मान्यता दिली.
  • २००६ : ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ
  • मेडिकल स्टडीज (एम्स), आयआयटी, आयआयएम आणि अन्य केंद्रीय शिक्षणसंस्थांतून ओबीसींसाठी २७ टक्के आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेतला.
  • २००८ : मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर राष्ट्रीय तपास संस्थेची (एनआयए) स्थापना केली गेली.
  • २ जुलै २००९ : राइट टू एज्युकेशन कायदा लागू केला.
  • ४ ऑगस्ट २००९ : राइट ऑफ चिल्ड्रन
  • टू फ्री अँड कम्पल्सरी एज्युकेशन अक्ट हा कायदा लागू करण्यात आला.

राजकीय कारकीर्द

  • डॉ. मनमोहनसिंग १९९१पासून राज्यसभा सदस्य होते.
  • ते १९९८ ते २००४ या काळात राज्यसभेत विरोधी पक्षनेता होते.
  • डॉ. सिंग २२ मे २००४ रोजी पहिल्यांदा देशाचे पंतप्रधान झाले.
  • ते २२ मे २००९ रोजी दुसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले.

पुरस्कार सन्मान

  • १९५६ केम्ब्रिज विद्यापीठाचाअॅडम स्मिथ पुरस्कार
  • १९८७ पद्मविभूषण
  • १९९३ व १९९४ अर्थमंत्र्यांना प्रदान करण्यात येणारेएशिया मनी अॅवॉर्ड
  • १९९३ युरो मनी पुरस्कार
  • १९९५ इंडियन सायन्स काँग्रेसचाजवाहरलाल नेहरू जन्मशताब्दी पुरस्कार
  • Changing India, The Quest for Equity in Development या पुस्तकांचे लिखाण त्यांनी केले

 जेष्ठ साहित्यिक बाप्सी सिधवा यांचे निधन

  • स्वातंत्र्यपूर्व काळात कराचीमध्ये जन्माला आलेल्या वंशाच्या ज्येष्ठ कादंबरीकार बाप्सी सिधवा यांचे अमेरिकेतील ह्युस्टन येथे वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले
  • अमेरिकेतील आशियाईदक्षिण साहित्यनिर्मितीच्या त्या अध्वर्यू मानल्या जातात.
  • सध्याच्या पाकिस्तानातील कराचीमध्ये पारशी कुटुंबात 11 ऑगस्ट 1938 रोजी सिधवा यांचा जन्म झाला
  • त्यानंतर त्यांचे कुटुंब लाहोर येथे स्थलांतरित झाले
  • वयाच्या दुसऱ्या वर्षी पोलिओची लागण झाली

प्रसिद्ध कादंबऱ्या

  • द क्रो इटर्सया कादंबरीतून आपली साहित्यिक कारकीर्द सुरू करणाऱ्या सिधवा यांनी नंतरआईस कँडी मॅन‘, ‘द ब्राइड‘, ‘अॅन अमेरिकन बॅट‘, ‘रायटिंग्ज ऑन लाहोरअशा अनेक एकापेक्षा एक सरस कादंबऱ्या लिहिल्या.
  • क्रो इटर्समधून पारशी समाजातील जीवन आणि त्यांचा इतिहास सिधवा यांनी जगासमोर  आणला.
  • आईस कँडी मॅनया फाळणीवर आधारित कादंबरीवर बेतलेला भारतीयअमेरिकन वंशाच्या निर्मात्या दीपा मेहता यांचाअर्थहा चित्रपट गाजला होता.
  • सिधवा यांनासिताराइम्तियाझया पाकिस्तानातील मानाच्या साहित्यिक पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

 प्रसिद्ध मल्याळम लेखक एम. टी. नायर यांचे निधन

  • प्रसिद्ध मल्याळम लेखक एम. टी. वासुदेवन नायर यांचे  दीर्घ आजाराने वयाच्या 91 व्या वर्षी निधन.
  • राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन तसेच देशभरातून एम. टी. नायर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त होत आहे
  • एमटी वासुदेवन नायर यांना 2005 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांना 7 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाले.
  • साहित्याबरोबरच पटकथा लेखक आणि दिग्दर्शक म्हणून चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवणाऱ्या एम.टी.ने शिक्षक आणि संपादक म्हणूनही काम केले.
  • केरळ सरकारने दोन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे.
  • मातृभूमी समूहाच्या नियतकालिकांचे ते संपादक होते. विज्ञानाचे पदवीधारक असलेल्या नायर यांचे पहिले पुस्तकनलुकेडूहे १९५८ मध्ये प्रकाशित झाले होते आणि १९५९ मध्ये या पुस्तकाला केरळचा साहित्य पुरस्कार मिळाला होता.
  • १९६० पासून नामांकित मल्याळी साहित्यिक आणि चित्रपट दिग्दर्शक म्हणून ते ओळखले जाऊ लागले.
  • नायर यांना १९९५ मध्ये ज्ञानपीठ पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *