चीनच्या नौदलाचे कमांडर डोंग जुन यांची देशाचे नवीन संरक्षणमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. डोंग यांनी ‘पीपल्स लिबरेशन आर्मी नेव्ही’ (पीएलएएन) या नावाने ओळखल्या जाणाऱ्या चीनच्या नौदलामध्ये सर्व महत्त्वाच्या विभागांमध्ये काम केले आहे.
• डोंग यांची 2021 मध्ये नौदलाच्या कमांडरपदी नेमणूक करण्यात आली होती.
• सध्या रशियाच्या नौदलाबरोबर सातत्याने संयुक्त युद्धसरावामध्ये सहभागी होणाऱ्या नॉर्दर्न सी फ्लीटमध्ये त्यांनी काम केले होते.