राज्य निवडणूक आयुक्तपदी दिनेश वाघमारे
- सनदीअधिकारी दिनेश वाघमारे यांची राज्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
- आगामीमहानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी नवीन आयुक्तांवर असेल.
- यू.पी.एस. मदानयांची मुदत गेल्या सप्टेंबरमध्ये संपल्यापासून निवडणूक आयुक्तपद रिक्त होते.
- राज्यपालराधाकृष्णन यांनी सरकारची शिफारस मान्य करीत दिनेश वाघमारे यांची राज्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. वाघमारे हे मूळचे नागपूरचे आहेत.
- वाघमारेयांनी नवी मुंबई व पिंपरी- चिंचवड महानगरपालिका आयुक्त, ऊर्जा, सामाजिक न्याय विभागांचे सचिव, विभागीय आयुक्त, विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे सदस्य सचिव काशा विविध पदांवर काम केले आहे.
प्रशासनातील 26 वर्षाचा अनुभव
- दिनेशवाघमारे हे 1994 च्या बॅचचे वरिष्ठ सनदी अधिकारी आहेत. त्यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित (महापारेषण) चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहिलेले आहे.
- तेसामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव आहेत.
- वाघमारेयांना व्यवस्थापन व प्रशासन क्षेत्रातील 26 वर्षांपेक्षा अधिक अनुभव आहे.
- त्यांनीबी. ई. (इलेक्ट्रॉनिक्स) विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेतून (व्हीएनआयटी) केले आहे.
- तेआयआयटी खरगपूरचे एम.टेक. (कॉम्प्युटर सायन्स) इंजिनिअर आहेत.
- इंग्लंडच्याब्रॅडफोर्ड विद्यापीठातून त्यांनी विकास आणि प्रकल्प नियोजन या विषयातून एमएसस्सी केलेली आहे.
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे 47 वे अध्यक्ष
- अमेरिकेच्याअध्यक्षपदाच्या निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे विजयी उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे 47 वे अध्यक्ष म्हणून 20 जानेवारी रोजी स्थानिक वेळेनुसार दुपारी 12 वाजता (भारतीय वेळेनुसार रात्री30 वाजता) शपथ घेतली.
- शपथघेतल्यांनतर केलेल्या पहिल्या अध्यक्षीय भाषणामध्ये ट्रम्प यांनी 20 जानेवारी 2025 हा स्वातंत्र्य दिवस म्हणून जाहीर केला.
- शपथविधीसोहळ्याला रिपब्लिकन पक्षाचे नेते, माजी राष्ट्राध्यक्ष आणि एलॉन मस्क व जेफ बेझोस यांच्यासारखे प्रभावशाली अब्जाधीश उपस्थित होते. परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिनिधित्व केले.
ट्रम्प यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे
- दक्षिणेकडील सीमेवर लष्कर पाठवू
- अमेरिकेलानव्या उंचीवर नेऊन ठेवू
- बेकायदास्थलांतरितांना रोखणार
- संविधानाचे संरक्षण करणार
- सरकारचेलष्करीकरण थांबवू
- स्त्रीआणि पुरुष हेच लिंग मान्य
- ‘अमेरिका फर्स्ट’ हेच धोरण
- घुसखोरी रोखण्यासाठी सैन्याला पूर्ण अधिकार
- अमलीपदार्थांचे तस्कर हे खरे दहशतवादी
- ‘ड्रिल बेबी ड्रिल’ या धोरणाची अंमलबजावणी होणार
- दुसऱ्या देशांवरील कर वाढविणार
- अमेरिकीसैन्य दुसऱ्या देशात लढाईसाठी जाणार नाही
- अमेरिकीलष्कराचे अधिकार वाढविणार
- पनामाकालवा ताब्यात घेणार
लातुरमध्ये ज्येष्ठांचे साहित्य संमेलन
- महाराष्ट्रराज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, लातूरमधील ज्येष्ठ नागरिक संघातर्फे ज्येष्ठांचे पहिले मराठी साहित्य संमेलन लातूर येथे 5 फेब्रुवारीला होणार आहे.
- माजीप्राचार्य नागोराव कुंभार संमेलनाचे अध्यक्ष तर सहकारमंत्री बाबासाहेब पाटील स्वागताध्यक्ष असतील.
- ज्येष्ठसाहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.
राष्ट्रीय आदिवासी आरोग्य परिषद 2025
- आदिवासीव्यवहार मंत्रालयाच्यावतीने आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सहकार्याने 20 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे ‘राष्ट्रीय आदिवासी आरोग्य परिषद 2025’चे आयोजन केले होते.
- भारतातीलआदिवासी समुदायांना भेडसावणाऱ्या गंभीर आरोग्य समस्या आणि त्यांना निरामय आरोग्य सेवा प्रदान करताना येणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान अंतर्गत हा एक महत्वपूर्ण आणि ऐतिहासिक उपक्रम घेण्यात आला.
- भौगोलिकविलगीकरण (दूरवर असलेल्या पाडे-वस्त्यांमुळे आलेले विलगीकरण)सामाजिक-आर्थिक वंचितता आणि खोलवर रुजलेल्या सांस्कृतिक परंपरांमुळे भारतातील आदिवासी समुदायांना अनेकदा खूप वेगळ्या, अशा आरोग्यविषयक आव्हानांना तोंड द्यावे लागते.
- याघटकांमुळे आरोग्यसेवेच्या उपलब्धतेमध्ये आणि फलनिष्पत्तीमध्ये लक्षणीय असमानता निर्माण होते.यामुळे यासाठी विशेष लक्ष आणि उपाय योजण्याची आवश्यकता आहे.
- याआव्हानांना प्रतिसाद म्हणून,भारत सरकारने अनेक परिवर्तनकारी पावले उचलली आहेत.
- राष्ट्रीयआदिवासी आरोग्य परिषद 2025 मध्ये प्रमुख भागधारकांना एकत्र आणण्यात आले .
- याकार्यक्रमात धोरणात्मक हस्तक्षेप, कृती-केंद्रित संशोधन आणि आदिवासी आरोग्यसेवा व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी अभ्यासक्रमात सुधारणा करण्याच्या उपक्रमांसाठी प्राधान्य क्षेत्रे ओळखण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.
- यापरिषदेचे उद्घाटन केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री जुआल ओराम यांनी केले.
- देशभरातून400 हून अधिक प्रतिनिधींनी या परिषदेला हजेरी लावली.