- भारतीय अंतराळ संशोधन संस्था भूनिरीक्षण उपग्रह ‘ईओएस- 08’चे प्रक्षेपण येत्या 15 ऑगस्टला करणार आहे.
- स्मॉल सॅटेलाइट लाँच व्हेइकल (एसएसएलव्ही-3) या प्रक्षेपकातून हा उपग्रह अवकाशात सोडला जाईल.
- उद्देश :भविष्यातील उपग्रहांसाठी नवतंत्रज्ञानाने युक्त असे सूक्ष्म उपग्रहांसाठी लागणारी यंत्रसामग्री तयार करणे आणि विकसित करणे हा या उपग्रह मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे.
तबर जहाजाचा जर्मनीच्या सी लिंक्ससोबत सागरी भागीदारी सराव
- भारतीय नौदलाची फ्रिगेट, INS तबरने दिनांक 5 ऑगस्ट 2024 रोजी सेंट पीटर्सबर्ग, रशिया येथून परतताना, कील कालव्याजवळ जर्मन नौदलासोबत सागरी भागीदारी सराव केला.
- INS तबरने यापूर्वी 17 ते 20 जुलै 2024 या कालावधीत, जर्मनीतील हॅम्बर्गला भेट दिली होती.
- दोन्ही देशांमधील सागरी संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने हा सराव आयोजित करण्यात आला होता.
- कील कालव्याजवळ भारतीय नौदल आणि जर्मन नौदल यांच्यातील एमपीएक्सचे आयोजन हे भारतीय नौदलाच्या सर्वदूर पोहोचण्याच्या आणि टिकून राहण्याच्या प्रयत्नांना सूचित करते; तसेच दोन्ही देशांमधील सागरी सहकार्यातील हा महत्त्वपूर्ण मैलाचा टप्पा आहे.
- जर्मन नौदलाच्या थर्ड स्क्वाड्रन नेव्हल एअर विंग 5 (MFG5) च्या सी लिंक्ससह MPX मध्ये जहाज नियंत्रित दृष्टीकोन, विंचिंग सराव आणि VERTREP मालिका यासारख्या प्रगत सागरी कारवायांचा समावेश होता.
- दोन्ही नौदलांच्या तुकड्यांनी उच्च पातळीवरील व्यावसायिकता आणि सहयोगात्मक प्रयत्नांना बळ देण्याप्रति असलेल्या आपल्या वचनबद्धतेचे दर्शन घडविले.
- भारत आणि जर्मनी यांच्यातील संबंध परस्परांची सामायिक मूल्ये, लोकशाही तत्त्वे आणि जागतिक शांतता आणि सुरक्षेसाठी वचनबद्धतेवर आधारित आहेत.
- भारतीय नौदल जगभरातील नौदलांसोबत सहकार्य वाढवण्यासाठी वचनबद्ध आहे.
- जर्मन नौदलासह MPX,हा उपक्रम मजबूत द्विपक्षीय नौदल संबंध आणि सागरी सुरक्षा कारवायांमध्ये एकत्र काम करण्याची एकमेकांची क्षमता मजबूत करतो.
वैनगंगा – नळगंगा नदीजोड प्रकल्पास मान्यता
- शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सिंचन निर्माण करून या भागातील शेतीला समृद्ध करणाऱ्या महत्वकांशी वैनगंगा- नळगंगा नदीजोड प्रकल्पास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
- 87 हजार 342 कोटी 86 लाख रुपयांच्या या प्रकल्पामुळे पावणे चार लाख हेक्टर क्षेत्राशी सिंचन होणार आहे.
- या प्रकल्पामुळे गोदावरीच्या उपखोऱ्यातून वैनगंगेतील पाणी बुलढाणा जिल्ह्यातील वैनगंगा प्रकल्पात आणण्यात येईल त्यासाठी एकूण 52 किलोमीटरचे जोड कालवे बांधण्यात येतील .
- विदर्भातील नागपूर ,वर्धा ,अमरावती, यवतमाळ ,अकोला ,बुलढाणा या जिल्ह्यातील 15 तालुक्यांना सिंचन तसेच पिण्याचे पाणी आणि औद्योगिक कारणासाठी याचा उपयोग होईल.
राज्य मंत्रिमंडळाचे काही महत्त्वाचे निर्णय:
- स्वातंत्रदिनाच्या पार्श्वभूमीवर येत्या 9 ऑगस्टपासून राज्यात हर घर तिरंगा अभियान राबविण्यात येणार
- प्रकल्पबाधितांच्या सदनिकांसाठी मिठागरांची जमीन उपलब्ध करून देणार
- आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षकांना शिक्षण पात्रता परीक्षेसाठी दोन वर्षे मुदतवाढ अनुसूचित जाती जमातीच्या जात, वैधता प्रमाणपत्र मिळण्यातल्या अडचणी दूर होणार
- अल्पसंख्याकांचे मागासलेपण दूर करण्यासाठी अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या स्थापनेस मान्यता
- कागल येथे आयुर्वेद महाविद्यालय. आजरा तालुक्यात योग व निसर्गोपचार महाविद्यालय
- मुंबई उच्च न्यायालयातून सेवानिवृत्त होणाऱ्या न्यायाधीशांना घरकामगार, वाहनचालक सेवा देणार