शिगेरू इशिबा जपानच्या पंतप्रधानपदी निवड
- जपानमधीलसत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाने शिगेरू इशिबा यांची पंतप्रधानपदासाठी निवड केली.
- याआठवड्यात ते जपानच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतील.
- शिगेरूइशिबा संरक्षण धोरणातील तज्ज्ञ असलेले इशिबा जपानचे माजी संरक्षणमंत्री आहेत.
- त्यांनी’नाटो’च्या धर्तीवर आशियामध्ये लष्करी आघाडीची संकल्पना मांडली आहे.
- तैवानमध्येलोकशाहीचे ते समर्थक आहेत.
- इशिबायांनी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत जपानच्या आर्थिक सुरक्षा मंत्री सानाई तातकाईची यांच्यावर मात केली.
- मावळतेते पंतप्रधान फुमिओ कीशीदा यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणामुळे पायउतार व्हावे लागले आहे .
संरक्षणतज्ञ ते पंतप्रधान
- संरक्षणतज्ज्ञअसलेले शिगेरू इशिबा या आठवड्यात ते पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. ‘नाटो’च्या धर्तीवर आशियामध्ये लष्करी आघाडीची संकल्पना त्यांनी मांडली आहे.
- याशिवाय जपान-अमेरिका संरक्षण भागीदारी अधिक समान व्हावी यासाठीही त्यांचा आग्रह आहे.
- तैवानमध्ये लोकशाही व्यवस्था असावी यासाठीचे ते खंदे समर्थक आहेत.
- पंतप्रधानपदाच्याशर्यतीमध्येत 67 वर्षीय इशिबा यांनी जपानच्या आर्थिक सुरक्षा मंत्री सानाई तकाईची यांच्यावर मात केली.
- तकाईचीयांना 94, तर इशिबा यांना 215 खासदारांची मते मिळाली.
- इशिबायांनी जपानचे कृषिमंत्री म्हणूनही यापूर्वी काम पाहिले आहे.
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन
- तमिळनाडूचेमुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांना उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
- याशिवायतमिळनाडूमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला असून, द्रमुक नेते सेंथिल बालाजी यांच्यासह तीन आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली.
- त्यांच्यासहद्रमुकचे आमदार आर. राजेंद्रन, गोवी चेझिआन आणि एस. एम. नासर यांना तमिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी यांनी रविवारी राजभवनात मंत्रिपदाची शपथ दिली.
- उदयनिधीस्टॅलिन यांच्याकडे युवक कल्याण आणि क्रीडा विकास खाते होते.
- मंत्रिमंडळातीलफेरबदलानंतर त्यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले असून, योजना आणि विकास विभागाची जबाबदारी त्यांना देण्यात आली.
अभिनेता ते उपमुख्यमंत्री
- चेन्नईतीललॉयला कॉलेजातून शिक्षण घेतलेले उदयनिधी स्टॅलिन यांनी राजकारणात येण्यापूर्वी अनेक चित्रपटांत अभिनय केला आहे. ते चित्रपट निर्मातेही होते.
- द्रमुकच्याविद्यार्थी शाखेचे नेतृत्वही त्यांनी केले आहे.
- सन2021 मध्ये राज्यातील विधानसभा निवडणुकीत ते पक्षाचा प्रमुख चेहरा म्हणून समोर आले.
- सन2022 मध्ये त्यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली होती.
अभिनेत्री डॅम स्मिथ यांचे निधन
- ‘दप्राइम ऑफ मिस जीन ब्रॉडी’साठी ऑस्कर जिंकणारी आणि हॅरी पॉटर चित्रपटांतील प्रोफेसर मिनर्वा रंगवून रसिकांची मने जिंकणारी ज्येष्ठ अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचे वयाच्या 89 व्या वर्षी लंडनमध्ये निधन झाले.
- ज्युडीडेंच व वेनेसा रेडग्रेव्ह यांच्या चित्रपटयुगातील समकालीन अभिनेत्री म्हणून पडद्यावर छाप पाडलेल्या स्मिथ यांना आपल्या अभिनयामुळे अनेक ऑस्कर नामांकने मिळाली होती; तसेच असंख्य चित्रपट पुरस्कारांवर त्यांनी आपले नाव कोरले होते.
- ‘सडनलीलास्ट समर’ ही टीव्ही मालिकाही त्यांनी गाजवली.
- एडिनबर्गमधीलप्रतिभावंत शिक्षिकेची भूमिका वठवलेल्या स्मिथ यांना या भूमिकेसाठी सन 1969 मध्ये ऑस्कर व ‘ब्रिटिश अॅकॅडमी फिल्म अॅवॉर्ड’ने गौरवण्यात आले होते.
- याशिवाय1978 मध्ये त्यांना कॅलिफोर्निया सूट्स’, ‘ओथेलो’ ‘ट्रॅव्हल्स विथ माय आंट’ या चित्रपटांसाठी सहायक अभिनेत्रीचे ऑस्कर पुरस्कार; तसेच गोल्ड ग्लोब पुरस्कार मिळाले होते.
- ‘रूमविथ ए व्ह्यू’साठी गोल्डन ग्लोब, 1984मध्ये ‘ए प्रायव्हेट फंक्शन’साठी बाफ्ता, 1988मध्ये ‘द लोनली पॅशन ऑफ जुडिथ हेर्न’ साठी बाफ्ता पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
- 2012मध्येस्मिथ पुन्हा ‘डाउनटाउन अॅबी’ या टीव्ही मालिकेतून रसिकांच्या दिवाणखान्यापर्यंत पोहोचल्या.