- संत तुकाराम महाराज संस्थानचे माजी विश्वस्त, तुकोबारायांचे दहावे वंशज संभाजी महाराज एकनाथ मोरे (देहूकर) यांचे 26 जून रोजी वयाच्या 76 व्या वर्षी निधन झाले.
- संभाजी महाराज यांनी संत तुकाराम महाराजांच्या जीवन चरित्राचा सांगोपांग अभ्यास करून कीर्तन, प्रवचन आणि चरित्र कथन या माध्यमांतून तुकोबारायांच्या आध्यात्मिक जीवनकार्याचा प्रचार-प्रसार केला आहे.
- त्यांनी तुकाराम महाराजांवर जीवनचरित्रात्मक कादंबरी लिहिली आहे.
- संभाजी महाराजांनी देहू संस्थानचे माजी विश्वस्त; तसेच पालखी सोहळा प्रमुख म्हणून सेवा केली आहे.
- अखिल भारतीय वारकरी मंडळाचे ते माजी प्रदेशाध्यक्ष होत.
- तुकोबारायांच्या जीवन चरित्राचा बारकाईने अभ्यास करून कीर्तन, प्रवचन आणि चरित्र कथन या माध्यमातून त्यांनी अध्यात्माचा प्रसार आणि प्रचार केला.
- महाबळेश्वर येथे 2009 मध्ये झालेल्या 82 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. आनंद यादव यांनी लिहिलेल्या ‘संतसूर्य तुकाराम महाराज’ कादंबरीतून तुकोबारायांचे चारित्र्य हनन झाल्याचा तीव्र निषेध केला. आग्रही मागणी करून यादव यांना राजीनामा देणे भाग पाडले. त्यामुळे ते संमेलन अध्यक्षांशिवाय पार पडण्याची नामुष्की ओढवली.
- संभाजी महाराज यांनी ‘तुका आकाशाएवढा कादंबरीचे लेखन केले होते.