हिंदुस्थान एअरोनॉटिक्सने हलक्या लढाऊ विमानाची ‘तेजस एमके वन ए’ या मालिकेतील ‘एलए 5033’ या विमानाची यशस्वी उड्डाण चाचणी घेतली. मुख्य चाचणी वैमानिक ग्रुप कॅप्टन के. के. वेणुगोपाल (निवृत्त) यांनी चाचणीवेळी या विमानाचे सारथ्य केले. ही चाचणी 18 मिनिटे चालली.
अधिक माहिती
• जागतिक बाजारपेठेत विकास आणि रचनेच्या दृष्टीने ‘एचएएल’चे हे मोठे यश
• संरक्षण मंत्रालय, भारतीय हवाई दल, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) त्याचप्रमाणे या क्षेत्रातील अन्य खासगी संस्थांचे सहकार्य लाभले.
• एचएएल ने या प्रकल्पासाठी विज्ञान आणि औद्योगिक संशोधन परिषद-राष्ट्रीय हवाई प्रयोगशाळेबरोबर (सीएसआयआर-एनएएल) तंत्रज्ञान हस्तांतर करार केला आहे. त्यातून भारतीय हवाई दलासाठी अत्याधुनिक, उपयुक्त हलकी लढाऊ विमाने तयार केली जाणार आहेत.
वैशिष्ट्ये
• अत्याधुनिक रडार यंत्रणा
• उत्कृष्ट संवाद यंत्रणा
• अतिरिक्त लढाऊ क्षमता
• प्रतिकूल हवामानासाठी योग्य