Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

तैवानच्या अध्यक्षपदी लाई चिंग-ते

तैवानचे विद्यमान उपाध्यक्ष आणि डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीचे(डीपीपी) उमेदवार लाई लाईट चिंग – ते यांचा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय झाला आहे. तैवानमध्ये कायदेमंडळ आणि अध्यक्षपदासाठी या दोन्ही निवडणुकांसाठी मतदान पार पडले. त्यामध्ये डीपीपीला सलग तिसऱ्यांदा ऐतिहासिक विजय मिळाला.

अधिक माहिती
● डीपीपी च्या त्सई इंग – वेन यांनी अध्यक्षपदाच्या दोन कारकीर्द पूर्ण केल्यानंतर आता त्यांचे सहकारी लाई चिंग- ते अध्यक्ष होणार आहेत.
● हा पक्ष चीन विरोधात स्वायत्त आणि सार्वभौम तैवानसाठी भूमिका घेण्यासाठी ओळखला जातो .
● गेल्या काही वर्षांमध्ये चीन आणि तैवान दरम्यान तणाव वाढला आहे त्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर या निवडणुकीकडे बारकाईने लक्ष ठेवले जात होते.
● लाई यांनी यापूर्वी ताईनं शहराचे महापौर म्हणून काम पाहिले आहेत.
● राष्ट्रीय संरक्षण अर्थव्यवस्था आणि लोकशाही मित्र देशांबरोबर सहकार्य बळकट करण्याचे काम पुढे सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले .
● चीनला प्रतिकार कायम ठेवण्यावरही त्यांनी निवडणूक प्रचारादरम्यान भर दिला होता.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *