नौदल दिन
- 4 डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा केला जातो. हा दिवस भारतीय नौदलाच्या देशाप्रती असलेल्या सामर्थ्य, धैर्य आणि समर्पणाचे प्रतीक आहे.
- भारतीय नौदल दिन साजरा करण्याची परंपरा 1972 मध्ये सुरू झाली, जेव्हा वरिष्ठ नौदल अधिकाऱ्यांच्या परिषदेत 4 डिसेंबर रोजी साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
- भारतीय नौदल दिन 4 डिसेंबर रोजी साजरा करण्याचे कारण 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धाशी संबंधित आहे.
- या युद्धात पाकिस्तानने 3 डिसेंबरला भारतीय विमानतळावर हल्ला केला. त्याला प्रत्युत्तर देत भारतीय नौदलाने 4 आणि 5 डिसेंबरच्या रात्री ‘ऑपरेशन ट्रायडंट’ राबवले.
- या मोहिमेत भारतीय नौदलाने पाकिस्तानच्या नौदलाचे मोठे नुकसान केले आणि शेकडो पाकिस्तानी नौदलाचे सैनिक मारले.
- या महान विजयाच्या स्मरणार्थ 4 डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
- ईस्ट इंडिया कंपनीने 1612 मध्ये रॉयल इंडियन नेव्हीची निर्मिती केली, तेव्हा भारतीय नौदलाची स्थापना झाली. त्याचा उद्देश व्यापारी जहाजांचे संरक्षण करणे हा होता. स्वातंत्र्यानंतर, 1950 मध्ये त्याची भारतीय नौदल म्हणून पुनर्रचना करण्यात आली.
- छत्रपती शिवाजी महाराज यांना “भारतीय नौदलाचे जनक” मानले जाते.
भारतीय नौदल
- स्थापना : 26 जानेवारी 1950
- मुख्यालय : नवी दिल्ली
- मोटो : शं नो वरुण:
- प्रमुख : दिनेश त्रिपाठी
बँकिंग कायदा सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर
- अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेले बँकिंग कायदे (दुरुस्ती) विधेयक 3 डिसेंबर रोजी लोकसभेमध्ये आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले.
- या विधेयकांद्वारे विद्यमान व्यवस्थेत 19 सुधारणा प्रस्तावित आहेत.
- प्रस्तावित सुधारणांमुळे बँकिंग क्षेत्रातील प्रशासन आणखी भक्कम होऊन ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या सेवेत सुधारणा होईल व ठेवीदारांचे संरक्षणही होईल.
- रिझर्व्ह बँक कायदा1934, बँकिंग नियमन कायदा 1949, स्टेट बँक ऑफ इंडिया कायदा 1955, बँकिंग कंपन्या (अधिग्रहण व मालकी हस्तांतरण)
- कायदा 1970 आणि बँकिंग कंपन्या (अधिग्रहण व मालकी हस्तांतरण) कायदा 1980 या कायद्यांमध्ये सुधारणा करण्यात आली.
- आता या सुधारणांमुळे बँकिंग क्षेत्रातील प्रशासन आणखी भक्कम होऊन ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या सेवेत सुधारणा होईल. याचबरोबर ठेवीदारांचे संरक्षणही होईल.
काही प्रमुख बदल
- बँक खातेदाराला वारसदार म्हणून चार व्यक्तींचे नामनिर्देशन शक्य
- बँकांच्या प्रशासन मानकांमध्ये सुधारणा
- ठेवीदारांच्या संरक्षणासाठी बँकांच्या लेखा परीक्षणात सुधारणा
- सहकारी बँकांच्या संचालकांच्या कार्यकाळात वाढ
- शिक्षण व संरक्षण निधीत, दावेरहित लाभांश, समभाग आणि व्याज अथवा रोखे परतावाही वर्ग होणार
- गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधीत वर्ग झालेली रक्कम लाभार्थीला परत मागता येईल.
विजय शंकर यांचे निधन
- केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) माजी संचालक विजय शंकर यांचे दीर्घ आजाराने वयाच्या 76 व्या वर्षी निधन झाले.
- त्यांच्या अंतिम इच्छेनुसार त्यांचे पार्थिव एम्स रुग्णालयाला दान केले जाणार असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली.
- उत्तर प्रदेश केडरचे 1969 च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी असलेल्या शंकर यांनी 12 डिसेंबर 2005 ते 31 जुलै 2008 दरम्यान सीबीआय चे प्रमुख म्हणून काम पाहिले.
- त्यांच्या कार्यकाळात सीबीआयने आरुषी-हेमराज दुहेरी हत्याकांडाचा तपास केला होता.
- सीबीआय संचालक म्हणून नियुक्त होण्यापूर्वी शंकर यांनी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि नागरी संरक्षण व गृहरक्षक दलाचे नेतृत्व केले.
- राष्ट्रपती पोलीस पदकाने त्यांचा गौरवण्यात आले होते.
दक्षिण कोरियात आणीबाणी लागू
- दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून सुक योल यांनी देशात विरोधी पक्षांवर ठपका ठेवत देशात मार्शल लॉची घोषणा केली.
- या घोषणेनंतर दक्षिण कोरियातील राजकीय तणाव वाढला आहे. उत्तरेकडील कम्युनिस्ट शक्तींपासून दक्षिण कोरियाचं रक्षण करण्यासाठी यून यांनी आणीबाणी जाहीर करीत असल्याचं सांगितलं.
- राष्ट्रपती यून सुक योल यांनी दक्षिण कोरियाला उत्तर कोरियाच्या कम्युनिस्ट शक्तींकडून होणाऱ्या धोक्यापासून वाचविण्यासाठी आणि देशविरोधी तत्वांचा समूळ नाश करण्यासाठी आपात्कालीन मार्शल लॉची घोषणा केली.
ऑस्ट्रेलियाचे टेनिसपटू फ्रेझर यांचे निधन
- ऑस्ट्रेलियाचे टेनिसपटू फ्रेझर यांचे वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाले.
- नील फ्रेझर यांनी एकेरी विभागात तीन ग्रँडस्लॅम विजेतेपदाचा मान संपादन केला होता, तसेच ऑस्ट्रेलियन संघाला चार वेळा डेव्हिस करंडक जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता.
- ऑस्ट्रेलियाच्या टेनिस संघाचे ते कर्णधारही होते.
- फ्रेझर यांची 1984 मध्ये आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेम या प्रतिष्ठेच्या यादीत निवड करण्यात आली, तसेच टेनिस या खेळामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना 2008 मध्ये आंतरराष्ट्रीय टेनिस संघटनेकडून फिलीप चाट्रीयर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
हॉर्नबिल महोत्सव
- हॉर्नबिल महोत्सव हा ईशान्य भारतातील नागालँड राज्यात 1 ते 10 डिसेंबर या कालावधीत साजरा होणारा वार्षिक उत्सव आहे.
- रानफळे-फुलांनी बहरलेल्या समृद्ध जंगलांची खूण असलेल्या अतिशय देखण्या अशा धनेश (हॉर्नबिल) पक्ष्याच्या नावाने नागालँडमध्ये दरवर्षी डिसेंबरमध्ये ‘हार्नबिल महोत्सव’ आयोजित केला जातो.
- त्याचे 2024 हे पंचवीसावे वर्ष आहे.
- राजधानी कोहिमातील किस्माया गावात हा महोत्सव होतो.
- कला, संस्कृती, परंपरा आणि निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या या उपक्रमात नागा जमातीचे लोक उत्साहाने सहभागी होतात.
- पूर्वीपासून नागा लोक धनेशला जंगलाचा राखणदार मानत आले आहेत.
- त्याची शिंगाच्या आकाराची चोच आणि काळी पांढरी लांबलचक पिसे यांना नागा सांस्कृतित अनन्यसाधारण महत्व आहे.
- नागालँडच्या सांस्कृतिक वारशाचा प्रचार करण्यासाठी, नागालँड सरकार दरवर्षी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात हॉर्नबिल महोत्सवाचे आयोजन करते.
- पहिला उत्सव डिसेंबर 2000 मध्ये आयोजित करण्यात आला होता.