दाओस परिषदेत विक्रमी गुंतवणूक
- दावोसयेथील जागतिक आर्थिक परिषदेत (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) पहिल्याच दिवशी महाराष्ट्राने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात विक्रमी 4 लाख 99 हजार 321 कोटी रुपये गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार केले.
- यागुंतवणुकीमुळे राज्यात सुमारे 92 हजार 235 इतकी रोजगारनिर्मिती होणार आहे.
- यागुंतवणुकीतील सर्वात मोठी गुंतवणूक जेएसडब्ल्यू उद्योगसमूहाने तीन लाख कोटी रुपयांची केली आहे. ती स्टील, नवीनीकरणीय ऊर्जा, पायाभूत सुविधा, सिमेंट, लिथियम-आयर्न बॅटरिज, सोलर वेफर आणि सेल मॉड्यल्स इत्यादी क्षेत्रात करण्यात आली आहे.
- मुख्यमंत्रीफडणवीस आणि उद्योगसमूहाचे अध्यक्ष सज्जन जिंदाल यांच्या उपस्थितीत सुमारे 3 लाख कोटी रुपयांची गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार करण्यात आला. पहिला करार गडचिरोलीत स्टील उद्योगासाठी करण्यात आला.
‘बालासोर ‘कडून 17 हजार कोटींची गुंतवणूक
- ‘बालासोरअॅलाईज कंपनी’ ने स्टील व धातू उद्योगात सुमारे 17 हजार कोटी रुपयांची गुंतवणुकीचा सामंजस्य करार केला असून त्यातून 3200 रोजगारनिर्मिती होणार आहे.
ई गव्हर्नन्स निर्देशांकात पुणे महापालिका अग्रस्थानी
- राज्यातीलमहापालिकांचा ‘ई गव्हर्नन्स निर्देशांक’ जाहीर करण्यात आला. त्यात पुणे महापालिकेने अग्रस्थान प्राप्त केले आहे.
- कोल्हापूरमहापालिकेने द्वितीय, तर पिंपरी-चिंचवड महापालिकेने तृतीय स्थान मिळवले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे अंध किंवा कमी दिसणाऱ्या व्यक्तींसाठी केवळ सात महापालिकांनीच स्क्रीन रीडरची सुविधा उपलब्ध करून दिल्याचे या निर्देशांकातून समोर आले आहे.
- पॉलिसीरिसर्च ऑर्गनायझेशनतर्फे हा निर्देशांक तयार करण्यात आला आहे.
- सेवा, पारदर्शकता, उपलब्धताहे प्रमुख तीन निकष, संकेतस्थळ, मोबाइल अॅप्लिकेशन, समाजमाध्यम ही तीन माध्यमे आणि काही उपनिकष अशा एकूण 101 निकषांवर महापालिकांचे मूल्यमापन करण्यात आले.
- 1 नोव्हेंबरते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत महापालिकांचे संकेतस्थळ, मोबाइल अॅप्लिकेशन आणि समाजमाध्यमे यांचा अभ्यास करून निर्देशांक तयार करण्यात आला.
- नेहामहाजन यांच्या नेतृत्वाखालील अभ्यास गटात श्वेता शहा, अनुजा सुरवसे, मनोज जोशी, गौरव देशपांडे यांचा समावेश होता.
- सरपरशुरामभाऊ महाविद्यालयाच्या डॉ. संज्योत आपटे यांनी सहकार्य केले. निर्देशांकातील उपलब्धता निकषावर मुंबई, कोल्हापूर, पुणे या महापालिका सर्वोत्तम ठरल्या.
- पारदर्शकतानिकषावर कोल्हापूर, मीरा-भाईंदर, पिंपरी-चिंचवड या महापालिकांनी आघाडी मिळवली, सेवा निकषावर पुणे, पिंपरी- चिंचवड, कोल्हापूर, संकेतस्थळ निकषावर पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई, मोबाइल अॅप्लिकेशन निकषावर कोल्हापूर, पुणे, पिंपरी- चिंचवड सर्वोत्कृष्ट ठरल्या, तर समाजमाध्यम या निकषावर 17 महापालिका प्रथम, 6 महापालिका द्वितीय, तर 6 महापालिका तृतीय स्थानी राहिल्या.
- निर्देशांकातपरभणी आणि जळगाव या दोन महापालिकांना शून्य गुण मिळाले आहेत.
- 9 महापालिकांनीपाचपेक्षा अधिक गुण मिळवले आहेत, तर 10 महापालिकांचे गुण तीनपेक्षा कमी आहेत.
पुण्यात ‘जीबीएस‘ चे 24 रुग्ण आढळले
- पुण्यात’गुइलेन बॅरे सिंड्रोम’ (जीबीएस) या आजाराच्या 24 संशयित रुग्णांची नोंद झाली असून, यातील आठ रुग्णांवर अतिदक्षता विभागात (आयसीयू) उपचार सुरू आहेत.
- दोनरुग्णांवर ‘व्हेंटिलेटर’वर उपचार सुरू आहेत.
- 24 रुग्णांपैकीपाच रुग्ण पुणे महापालिकेच्या हद्दीतील असून, अन्य रुग्ण पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील असल्याचा दावा महापालिकेच्या आरोग्य विभागाने केला आहे.
- गेल्याआठवड्यापासून ‘जीबीएस’चे रुग्ण आढळून येत आहेत. सर्व 24 रुग्णांवर शहरातील विविध खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
गुइलेन बॅरे सिंड्रोम म्हणजे काय ?
- गुइलेनबॅरे सिंड्रोम या आजारामध्ये रुग्णांची प्रतिकारशक्ती चेतासंस्थेवर (नर्वस सिस्टम) आघात करते.
- यामुळेरुग्णांच्या प्रकृतीमध्ये गुंतागुंत निर्माण होते. रुग्णाला विषाणू किंवा जीवाणू कोणत्याही प्रकारचा संसर्ग झाल्यावर शरीराची प्रतिकारशक्ती त्याविरोधात लढते.
- मात्र, काहीवेळा प्रतिकारशक्ती अतिप्रमाणात वाढल्यास ती स्वतःच स्वतःला नष्ट करते. त्यामुळे गुंतागुंत निर्माण होते.
- नसांवरआणि स्नायूंवरदेखील याचा परिणाम होतो.
- सर्ववयोगटातील नागरिकांना हा आजार होऊ शकतो.
लक्षणे :
1)धाप लागणे
2)हात, पायांना मुंग्या येणे
3) हातापायांची कार्यक्षमता कमी होणे
4)गिळण्यास त्रास होणे
5)श्वास घेण्यास त्रास होणे
किसन महाराज साखरे यांचे निधन
- संतसाहित्यव ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक आणि राज्य सरकारच्या ज्ञानोबा तुकाराम पुरस्काराचे मानकरी किसन महाराज यांचे वृद्धापकाळाने वयाच्या 86 व्या निधन झाले.
- आजोबानाना महाराज साखरे आणि वडील दादा महाराज साखरे यांची संतसाहित्य अभ्यासाची परंपरा किसन महाराज यांनी पुढे नेली.
- त्यांचाजन्म पानचिंचोली (जि. लातूर) येथे झाला होता.
- कोणतेहीऔपचारिक शिक्षण न घेता बालवयात किसन महाराज यांना संतसाहित्याच्या अध्ययनाचे संस्कार लाभले.
- श्रीक्षेत्र आळंदी येथील साधकाश्रमात गुरू-शिष्य परंपरेचा अंगीकार करून किसन महाराज यांनी संत साहित्य, तत्त्वज्ञान, व्याकरणशास्त्र याचे शिक्षण तत्त्वज्ञ एन. पी. मोडक यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हे शिक्षण घेतले.
- 1960 सालीसाधकाश्रमाची धुरा किसन महाराजांच्या हाती आली. तेव्हापासून कीर्तन, प्रवचन करणारे शेकडो विद्यार्थी त्यांनी घडविले.
- मूल्याधिष्ठितशिक्षण प्रणालीच्या ध्यासातून मोफत बालसंस्कार शिबिरांची संकल्पना त्यांनी यशस्वीरित्या राबविली.
- संतसाहित्यआणि तत्त्वज्ञानाच्या प्रचार, प्रसारासाठी आधुनिक तंत्रज्ञान अतिशय गरजेचे आहे, हे लक्षात घेऊन किसन महाराजांनी प्रगत संगणक अध्ययन केंद्राच्या (सी- डॅक) माध्यमातून अध्यापनास सुरुवात केली.
- बुलढाणाजिल्ह्यातील हिवरा येथे आयोजित झालेल्या अखिल भारतीय कीर्तनकार संमेलनाचे अध्यक्षपद साखरे यांनी भूषविले होते.
- राज्यसाहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले होते.
- ज्ञानेश्वरीवाचन मंदिर, रंगनाथ महाराज चॅरिटेबल ट्रस्टचे ते विश्वस्त होते. श्री क्षेत्र आळंदीच्या ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती.
- किसनमहाराजांनी संस्कृत आणि मराठीतून एकूण 115 ग्रंथ लिहिले आहेत.
- सार्थज्ञानेश्वरी, सार्थ एकनाथी भागवत, सार्थ तुकाराम महाराज गाथा, सार्थ भगवद्गीता, सार्थ ब्रह्मसूत्र, सार्थ उपनिषद, सोहम योग, ज्ञानेश्वर महाराज चरित्र या सारखी ग्रंथ संपदा त्यांच्या लेखणीतून साकार झाली आहे.
जागतिक आरोग्य संघटना, पॅरिस करारातून अमेरिका बाहेर
- अमेरिकेच्याअध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णयांचा धडाका लावला असून, जागतिक आरोग्य संघटनेसह (डब्लूएचओ) पॅरिस हवामान करारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
- तसेच, भारताचासमावेश असलेल्या ‘ब्रिक्स’ संघटनेने डॉलरला पर्याय शोधण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर 100 टक्के कर लावू, असा इशारा दिला आहे.
- अमेरिकाबाहेर पडल्यानंतर आरोग्य संघटनेला निधीची चणचण भासणार आहे.
- जागतिकआरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याच्या आदेशावर ट्रम्प यांनी सही केली. या संघटनेतून अमेरिका बाहेर पडण्याची पाच वर्षांतील ही दुसरी वेळ आहे.
ट्रम्प सरकारने घेतलेले महत्वाचे निर्णय:
मध्यवर्ती सरकारमधील भरती थांबविणे
- सरकारमधीलकर्मचाऱ्यांची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी, सरकारचा आकार कमी करण्याचा प्रयत्न करताना भरतीवर तात्पुरते निर्बंध आणले आहेत.
- अमेरिकेच्याजनतेच्या विश्वासाला पात्र ठरणारे सक्षम लोकांची नियुक्ती करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे ट्रम्प यांनी सांगितले.
- राष्ट्रीयसुरक्षा आणि सार्वजनिक सुरक्षेसह सैन्यदलातील भरतीचा याला अपवाद करण्यात आला आहे.
पॅरिस हवामान करारातून माघार
- कार्बनचेसर्वाधिक उत्सर्जन करणाऱ्या देशांपैकी एक अमेरिका आहे. पण तरीही पॅरिस हवामान करारातून बाहेर पडण्याचा निर्णय ट्रम्प यांनी घेतला आहे.
- 2015 च्याकरारातून माघार घेण्याचा अमेरिकेचा विचार असल्याचे पत्र संयुक्त राष्ट्राला (यूएन) देण्यात येणार असून त्यावरही नव्या अध्यक्षांनी स्वाक्षरी केली.
- पॅरिसकरारातून माघार घेण्याच्या प्रक्रियेला एक वर्षाचा कालावधी लागणार आहे.
पॅरिस करार:
- पॅरिसकरार, पॅरिस एकमत तथा पॅरिस पर्यावरण करार हा संयुक्त राष्ट्राच्या जागतिक वातावरण बदलाच्या सभेतील (यु एन एफ सी सी सी) एक करार आहे.
- हाकरार हरितगृह वायूच्या उत्सर्जन, उपशमन व त्यासाठीच्या आर्थिक तरतुदींबद्दल आहे.
- 195 देशांच्याप्रतिनिधींनी वातावरण बदलाच्या सभेच्या पॅरिस येथे झालेल्या 21 व्या संमेलनात वाटाघाटी करून या कराराचा मसुदा निश्चित केला व 12 डिसेंबर 2015 रोजी या कराराला एकमताने मान्यता दिली.
- सर्वदेशांनी आपापल्या संसदेची मान्यता मिळवून करारावर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यासाठी 22 एप्रिल 2016 (पृथ्वी दिवस) पासून पुढे एक वर्ष कालावधी देण्यात आलेला होता.
- सध्याजगभरातून होणाऱ्या एकूण हरितगृह वायू उत्सर्जनापैकी किमान 55 टक्के उत्सर्जनासाठी कारणीभूत असलेल्या 55 देशांनी अधिकृत सह्या केल्या की हा करार सर्व जगाला लागू झाला असे मानण्याला सर्व देशांनी मान्यता दिलेली होती.
- 4 ऑक्टोबर2016 रोजी या अटीची पूर्तता झाली, आणि 4 नोव्हेंबर 2016 पासून हा करार अधिकृतरित्या लागू झाला असे जाहीर करण्यात आले.
‘डब्लूएचओ‘तून बाहेर पडणार
- जागतिकआरोग्य संघटनेतून (डब्लूएचओ) अमेरिका बाहेर पडेल, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे.
- कोरोनाचीसाथ आणि इतर आंतरराष्ट्रीय आरोग्य संकटांकडे ‘डब्लूएचओ’चे दुर्लक्ष झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.
इंटरनेटच्या वापरात केरळ अव्वलस्थानी
- इंटरनेटच्यासर्वाधिक वापरात केरळने (72 टक्के) अव्वल स्थान पटकावले असून, पाठोपाठ गोवा (71 टक्के) आणि महाराष्ट्राचा (70 टक्के) क्रमांक लागतो.
- देशातीलइंटरनेट यूजरची संख्या06 कोटींवर पोहोचली आहे.
- यासंख्येत दर वर्षी आठ टक्के वाढ नोंदविण्यात येत आहे.
- सर्वाधिकवाढ ग्रामीण भागात नोंदविण्यात आली आहे.
- देशातील98 टक्के यूजरचा भारतीय भाषांमध्ये इंटरनेटचा वापर करीत असल्याचेही दिसून आले आहे.
- ‘इंटरनेटमोबाइल असोसिएशन ऑफ इंडिया’ (आयएएमएआय) आणि मार्केट रिसर्च फर्म ‘कंटार’ यांच्या ‘इंटरनेट इन इंडिया 2024’ या अहवालातून ही बाब समोर आली आहे.
41 टक्के जनता इंटरनेटपासून लांबच
- सर्वेक्षणातनमूद केल्यानुसार, 41 टक्के भारतीय जनता अजूनही इंटरनेटपासून चार हात लांबच आहे. पैकी 51 टक्के जनता ग्रामीण भागातील आहे. मात्र, दर वर्षी हा आकडा कमी कमी होत आहे.
इंटरनेट वापरात पुरुष आघाडीवर
- सन2024 मध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणात देशातील 53 टक्के पुरुष आणि 47 टक्के स्त्रिया इंटरनेटचा वापर करीत असल्याचे समोर आले आहे.
- ऑनलाइनशॉपिंग करताना5 कोटी ग्राहक ‘कॅश ऑन डिलिव्हरी’चा उपयोग करीत असून, त्यात सर्वाधिक (52 टक्के) महिला आहेत.
- देशातीलपाचपैकी एकच यूजर इंटरनेट वापरताना ‘व्हॉइस असिस्टंट’चा वापर करतो. पैकी 39 टक्के यूजर हे 25 ते 44 या वयोगटातील आहेत.
- सर्वाधिकवापर हिंदी भाषेचा (24%) तर तामिळ(6%), तेलुगू(4%), मराठी(3%).