Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

नरेंद्र मोदी यांच्या हस्ते युद्धनौकांचे लोकार्पण

नरेंद्र मोदी यांच्या हस्ते युद्धनौकांचे लोकार्पण

नरेंद्र मोदी यांच्या हस्ते युद्धनौकांचे लोकार्पण

  • स्वदेशी बनावटीच्या सूरत आणि निलगिरी या युद्धनौका आणि वाघशीर पाणबुडी नौदल गोदीतील कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
  • राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संरक्षणमंत्री राजनाथसिंह, संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नौदलप्रमुख अॅडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी उपस्थित होते.

आयएनएस सुरत

  • ‘आयएनएस सुरत’ ही भारतीय नौदलाच्या प्रोजेक्ट15  बीअंतर्गत तयार झालेली स्टेल्थ विनाशिका वर्गातील चौथी युद्धनौका आहे.
  • स्वदेशी तंत्रज्ञानाचा उत्कृष्ट नमुना असलेली ही नौका कृत्रिम बुद्धिमत्तेने (एआय) सुसज्ज असलेली पहिली युद्धनौका ठरली असून गुजरातच्या सुरत या शहरावरून तिला नाव देण्यात आले आहे.
  • एकेकाळी भारतातील प्रमुख व्यापारी बंदर म्हणून या शहराची ओळख होती.
  • शत्रूला चकवून अचूक प्रहार करण्यास ही युद्धनौका सक्षम आहे.
  • अवघ्या31 महिन्यांत ही युद्धनौका बांधण्यात आली असून सर्वात वेगाने बांधण्यात आली आहे.
  • भारतीय नौदलाच्या वॉरशिप डिझाइन ब्युरोचे डिझाइन असलेली ही युद्धनौका माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने बांधली आहे.
  • ही नौका प्रगत शस्त्रास्त्रे आणि अत्याधुनिक रडार यंत्रणेने सुसज्ज आहे.
  • एआय आधारित’कॉम्बॅट मॅनेजमेंट सिस्टीम’द्वारे ही नौका शत्रूच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवू शकते.
  • 2011 मध्ये चार युद्धनौकांच्या बांधकामाचा करार करण्यात आला होता. याआधी आयएनएस विशाखापट्टणम(2021), मोरमुगाओ (2022), इंफाळ (2023) या नौका सेवेत दाखल झाल्या आहेत.

वैशिष्ट्ये:

  • लांबी: 163 मीटर
  • रुंदी: 17.4 मीटर
  • ड्राफ्ट: 6.5 मीटर
  • वजन: 7,400टन
  • वेग: 30 नॉट्स (सुमारे 55 किमी/ तास)
  • क्षमता: 300 पेक्षा अधिक अधिकारी आणि खलाशी

तंत्रज्ञान:

  • इंधन क्षमता : लांब पल्ल्याच्या
  • मोहिमांसाठी प्रगत डिझेल-इलेक्ट्रिक प्रणाली
  • डिझाइन: स्टेल्थ वैशिष्ट्यांसह रडार प्रतिबंधक क्षमता
  • चार गॅस टर्बाइन इंजिन्स
  • ऑपरेटिंग रेंज: 4000 नॉटिकल मैल (सुमारे 7400 किमी)

क्षेपणास्त्रे क्षमता:

  • ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ मिसाईल्स(लांब पल्ल्याचा प्रहार)
  • वरुणास्त्र(स्वदेशी बनावटीचा)
  • बाराक-8 सरफेस टू एअर मिसाइल्स(70 किमीपर्यंत मारक क्षमता)
  • 76 मिमी सुपर रॅपिड गन मॉडेल
  • 30 मिमी क्लोज-इन वेपन सिस्टीम
  • टॉरपीडो: अॅडव्हान्स लाइट टॉरपिडो प्रणाली

आयएनएस निलगिरी:

  • ‘अदृश्य बळ, अजेय शौर्य’ या बोधवाक्याने प्रेरित’आयएनएस निलगिरी’ स्वदेशी जहाजबांधणी क्षेत्रातील हा महत्त्वाचा टप्पा आहे.
  • प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेली ही युद्धनौका सागरी देखरेख, बचाव मोहिमा आणि युद्धकार्य यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.
  • गुप्तता तंत्रज्ञानामध्ये रडार-शोषक साहित्य, प्रक्षेपण क्षेपणास्त्र प्रणाली, फ्लश्ड शस्त्र प्रक्षेपक, ध्वनिक प्रतिबंधक, इन्फ्रारेड दडपण प्रणाली(आयआरएसएस) यांचा समावेश आहे.
  • या तंत्रज्ञानामुळे शत्रू राष्ट्रांना ही नौका समुद्रात सहज ओळखता येणार नाही. याशिवाय एमएफ आणि थ्रीडी एएसआर रडार प्रणालींमुळे हवाई, पृष्ठभागीय व पाणबुडीविरोधी युद्धात नौकेची कार्यक्षमता वाढली आहे.
  • इंटिग्रेटेड प्लॅटफॉर्म मॅनेजमेंट सिस्टीम(आयपीएमएस) आणि कॉम्बॅट मॅनेजमेंट सिस्टीम (सीएमएस) यांसारख्या स्वयंचलित प्रणालींमुळे ही युद्धनौका वेगळी ठरते.
  • इन्फ्रारेड दडपण प्रणाली(आयआरएसएस) नौकेची उष्णता कमी करते. ज्यामुळे शत्रूच्या नजरेत युद्धनौका पडत नाही.
  • एमएच60 आर आणि एएलएच हेलिकॉप्टरसाठी अत्याधुनिक सुविधांमुळे हवाई मोहिमा अधिक प्रभावीपण राबवता येतील.

वैशिष्ट्ये:

  • वजन: 6,700 टन
  • लांबी: 150 मीटर
  • वेग: 28 नॉट्सपेक्षा अधिक वेग
  • क्षमता: 225 कर्मचाऱ्यांची तुकडी
  • इंटिग्रेटेड प्लॅटफॉर्म मॅनेजमेंट सिस्टम

कॉम्बॅट मॅनेजमेंट सिस्टम

  • हेलिकॉप्टरसाठी सुविधा

प्रहार क्षमता:

  • बराक-8 क्षेपणास्त्र प्रणाली
  • ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ मिसाइल
  • 76 मिमी सुपर रॅपिड गन माउंट
  • तोर्बेडो ट्युब्स
  • आधुनिक रॉकेट लॉन्चर

कुठे तयार झाले?

  • पहिले जहाज मुंबईतील’माझगाव डॉक शिपबिल्डर लिमिटेड’ (एमडीएसएल) येथे तयार करण्यात आले आहे.
  • आणखी तीन जहाज गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स(जीआरएसई) कोलकाता येथे तयार करण्यात येणार आहेत.
  • ‘प्रोजेक्ट17 ए’ अंतर्गत ‘वॉरशिप डिझाइन ब्युरो’चे डिझाईन.

आयएनएस वाघशीर:

  • ‘आयएनएस वाघशीर’ ही स्कॉर्पिन श्रेणीची प्रोजेक्ट75 अंतर्गत तयार झालेली सहावी पाणबुडी आहे.
  • स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित ही पाणबुडी भारतीय नौदलाची शक्ती आणि आत्मनिर्भरता दर्शवते.
  • यामुळे भारताच्या सागरी सीमांची सुरक्षा अधिक मजबूत होईल आणि हिंद महासागर क्षेत्रात सामरिक वर्चस्व राखण्यास मदत होईल.
  • या पाणबुडीत अत्याधुनिक स्टेल्थ तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. त्यामुळे ही पाणबुडी शत्रूच्या रडार किंवा सोनारवर पकडली जात नाही.
  • गुप्त ऑपरेशन्स आणि शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवणे एवढेच या पाणबुडीचे कार्य नसून ती प्रभावीपणे हल्लाही करू शकते.
  • ‘वाघशीर’ ही अत्याधुनिक वायर-गाइडेड टॉर्पिडो आणि अँटी-शिप मिसाइल्सने सुसज्ज आहे.
  • या पाणबुडीत सोनार प्रणाली आणि इतर आधुनिक सेन्सर्स सुसज्ज असून शत्रूच्या जहाजांचा आणि पाणबुड्यांचा शोध घेण्यातही सक्षम आहे.
  • पाण्याखाली दीर्घकाळ कार्य करण्यास सक्षम असून डिझेल-इलेक्ट्रिक प्रणोदन प्रणाली, गुप्तपणे आश्रय घेण्याची आणि समुद्रात लांब अंतरावर कार्य करण्याची क्षमता या पाणबुडीत आहे.

वैशिष्ट्ये:

  • लांबी: 67.5 मीटर
  • वजन(पृष्ठभाग) : 1,615 टन
  • वजन(पाण्याखाली) : 1775टन
  • गती: 20-25 नॉट्स (37-46 किमी/ तास)
  • ध्वनिक सायलेन्सिंग तंत्रज्ञानाने सज्ज

नाव कसे दिले?

  • ‘वाघशीर’ हे नाव सागरी वाघ माशावरून(थ्रेशर शार्क) देण्यात आले आहे. हा मासा समुद्राच्या पाण्यात सहज लपू शकतो.
  • गुप्त ऑपरेशन्स आणि शत्रूच्या पाणबुड्यांवर लक्ष ठेवण्याच्या क्षमतेवरूनच या माशाचे पाणबुडीला नाव देण्यात आले आहे.

स्कॉर्पिन पाणबुड्या:

  • स्कॉर्पिन श्रेणीतील इतर पाणबुड्या आयएनएस कलवरी, आयएनएस खांदेरी, आयएनएस करंज, आयएनएस वेला आणि आयएनएस वागीर.
  • शिपबिल्डर्स लिमिटेड(एमडीएसएल) आणि फ्रान्सच्या नेव्हल ग्रुप यांच्या सहकार्याने ‘वाघशीर’ पाणबुडीची निर्मिती करण्यात आली आहे. 

राष्ट्रीय स्टार्ट अप दिन

  • राष्ट्रीय स्टार्टअप दिवस दरवर्षी16 जानेवारी रोजी साजरा केला जातो. हा दिवस स्टार्टअप संस्थापकांच्या सर्जनशीलता, दृढनिश्चय, आत्म्याचा सन्मान करतो.

इतिहास

  • 2016 मध्ये स्टार्टअप इंडिया योजनेच्या स्थापनेनंतर व्यवसायांना मान्यता देण्याच्या कल्पनेला जोर आला. तेव्हापासून, भारत सरकारने नवनिर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि उद्योजकांसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी अनेक प्रयत्न सुरू केले आहेत.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय अर्थव्यवस्थेत स्टार्टअप्सच्या योगदानाची दखल घेण्यासाठी2022 मध्ये 16 जानेवारी हा राष्ट्रीय स्टार्टअप दिवस म्हणून घोषित केला.

 2024 ठरले सर्वाधिक उष्ण वर्ष

  • भारतासाठी2024 हे वर्ष 1901 पासूनचे सर्वाधिक उष्ण वर्ष ठरले आहे.
  • सन2024 मध्ये देशाच्या म कमाल आणि किमान तापमानाची  मध्यमा (मीन टेम्परेचर) दीर्घकालीन  सरासरीपेक्षा65 अंश सेल्सिअस  अधिक नोंदली गेली.
  • मागील वर्षी सर्व ऋतूंमध्ये देशातील तापमान सरासरीपेक्षा जास्त राहिल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या(आयएमडी) नोंदींमधून स्पष्ट झाले.
  • आयएमडीच्या स्थापनेला150 वर्षे झाल्याच्या निमित्ताने नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात देशाचा 2024 चा वार्षिक हवामान अहवाल प्रसिद्ध करण्यात आला.
  • देशात गेले वर्षभर तापमान सरासरीपेक्षा जास्त राहिल्याचे या अहवालातून समोर आले.
  • आयएमडीच्या अहवालानुसार, 2024 मध्ये देशभरात65 अंश सेल्सिअस इतकी विक्रमी तापमानवाढ नोंदली गेली.
  • याआधी2016 मध्ये देशाचे तापमान सरासरीपेक्षा54 अंश सेल्सिअस इतके जास्त नोंदले गेले होते.
  • देशात गेल्या शतकातील सर्वाधिक15 उष्ण वर्षांमध्ये पहिली दहा उष्ण वर्षे गेल्या 15 वर्षांतील आहेत.
  • गेले दशकही देशात आतापर्यंतचे सर्वाधिक उष्ण दशक ठरले आहे.

देशातील आतापर्यंतची पहिली पाच

  • उष्ण वर्षे पुढील प्रमाणे(कंसात सरासरीपेक्षा अधिक तापमान अंश सेल्सिअसमध्ये)

1) 2024 (0.65)

2)2016 (0.54)

3)2009 (0.40)

4)2010 (0.39)

5)2017 (0.38)

भारतीय महिला संघाने रचला विक्रम

  • राजकोट येथील सौरराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाने वन डे कक्रिकेट प्रकारात आयर्लंड संघाविरुद्ध435 धावसंख्येचा विक्रम रचला.
  • भारतीय महिला संघाने वन-डे क्रिकेटमध्ये प्रथमच400 धावांचा टप्पा पार केला.
  • भारतीय महिलांनी5 बाद 435 धावा ही आंतरराष्ट्रीय वन-डे क्रिकेटमध्ये भारताकडून नोंदली गेलेली सर्वोच्च धावसंख्या.
  • महिलांच्या वन- डे क्रिकेटमध्ये491 ही सर्वोच्च धावसंख्या. न्यूझीलंडने 2018 मध्ये आयर्लंडविरुद्ध ही धावसंख्या उभारली होती.
  • भारतीय महिलांनी आयर्लंड विरुद्ध304 धावांनी विजय नोंदवला.
  • महिलांच्या वन-डेत भारताने धावांनी नोंदवलेला हा सर्वांत मोठा विजय ठरला. यापूर्वीचा मोठ्या विजयाचा विक्रम आयर्लंडविरुद्धच होता. 2017मध्ये आयर्लंडविरुद्ध भारताने249 धावांनी विजय नोंदवला होता.
  • महिलांच्या वन-डे क्रिकेटमध्ये चारशेहून अधिक धावा करणारा भारत तिसरा संघ ठरला. यापूर्वी, न्यूझीलंडने चार वेळा(4 बाद 491 वि. आयर्लंड, 5 बाद 455 वि. पाकिस्तान, 3 बाद 440 वि. आयर्लंड, 48 वि. आयर्लंड), तर ऑस्ट्रेलियाने एकदा (3 बाद 412 वि. डेन्मार्क) अशी कामगिरी केली आहे.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *