- भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालया अंतर्गत असलेल्या बेंगळुरू येथील राष्ट्रीय मानसिक आरोग्य आणि मज्जाविज्ञान संस्था (निम्हंस) या राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्थेला जागतिक आरोग्य संघटनेकडून (डब्लूएचओ) 2024 साठीचा नेल्सन मंडेला आरोग्य प्रचार पुरस्कार मिळाला आहे.
- नेल्सन मंडेला आरोग्य प्रचार पुरस्कार, 2019 मध्ये डब्लूएचओ द्वारे स्थापित केला गेला, व्यक्ती, संस्था आणि/किंवा सरकारी किंवा बिगर-सरकारी संस्थांच्या आरोग्य प्रचारामध्ये केलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी दिला जातो.
- हा पुरस्कार निम्हंसच्या मानसिक आरोग्य आणि कल्याणाच्या प्रचारासाठी केलेल्या समर्पण आणि उत्कृष्ट योगदानाचा साक्षीदार आहे.
- निम्हंस मानसिक आरोग्य आणि तंत्रज्ञानाच्या आघाडीवर आहे, संशोधन, शिक्षण, आणि रुग्णसेवेसाठी अभिनव दृष्टिकोनांचा प्रचार निम्हंस करत आहे.