- आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या सदस्यपदी नीता अंबानी यांची एकमताने फेरनिवड झाली आहे.
- एकूण 93 मतदारांनी मतदान केले आणि सर्व 93 मते नीता अंबानी यांना मिळाली.
- नीता अंबानी 2016 रिओ दि जानेरो ऑलिंपिक गेम्समध्ये प्रथमच आयओसी सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या.
- नीता अंबानी यांच्या नेतृत्वाखाली भारताला 40 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आयओसीच्या वार्षिक बैठकीचे यजमानपद मिळाले आहे.