कामगार कायद्याच्या उल्लंघन प्रकरणी बांगलादेशचे नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ञ डॉक्टर महंमद युनूस यांना न्यायालयाने सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.कामगार न्यायालयाच्या न्यायाधीश शेख मरीना सुलताना यांनी युनिस यांना सहा महिन्यांच्या साध्या कायद्याची शिक्षा सुनावण्यात येत असल्याचे जाहीर केले.
अधिक माहिती
● ग्रामीण टेलिकॉम चे अध्यक्ष म्हणून डॉक्टर युनूस यांच्यासोबत कंपनीच्या अन्य तीन पदाधिकाऱ्यांना न्यायालयाने ही शिक्षा सुनावली.
● या चौघांना प्रत्येकी 25000 टका इतका दंड हे ठोठावण्यात आला आहे.
● ग्रामीण बँकेच्या माध्यमातून गरिबी निर्मूलन मोहीम राबविल्याबद्दल युनूस यांना 2006 यावर्षी नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.


