पंचायात राज पुरस्कारात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
- केंद्राच्या पंचायती राज मंत्रालयाने जाहीर केलेल्या विविध श्रेणींमधील 45 पुरस्कारांपैकी सहा पुरस्कार जिंकून महाराष्ट्राने दुसरे स्थान पटकावले आहे. तर प्रत्येकी सात पुरस्कारांसह ओडिशा आणि त्रिपुरा संयुक्तपणे प्रथम क्रमांक मिळविला आहे.
- पंचायती राज मंत्रालयाकडून दरवर्षी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पंचायत संस्थांना राष्ट्रीय स्तरावर विविध श्रेणींमध्ये पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते.
- या वेळी दीनदयाळ उपाध्याय पंचायत शाश्वत विकास पुरस्कार अंतर्गत, शाश्वत विकास उद्दिष्टांसाठी ओळखल्या गेलेल्या नऊ श्रेणींमधील पहिल्या तीन ग्रामपंचायतींना एकूण 27 पुरस्कार दिले जाणार आहेत.
- तर नानाजी देशमुख उत्कृष्ट पंचायत शाश्वत विकास पुरस्कार पहिल्या तीन गाव, गट आणि जिल्हा पंचायतींना देण्यात येणार आहेत.
- तसेच ग्राम ऊर्जा स्वराज विशेष पंचायत पुरस्कार आणि कार्बन न्युट्रल विशेष पंचायत पुरस्कार प्रत्येकी तीन सर्वोत्कृष्ट पंचायतींना दिला जाणार आहे.
- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 11 डिसेंबर रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवनात विजेत्या पंचायत संस्थांना हे पुरस्कार प्रदान केले जातील.
पुरस्कार विजेते
- राज्यात दीनदयाल उपाध्याय पंचायत सतत विकास पुरस्कार श्रेणीमध्ये स्वच्छ व हरित पंचायत म्हणून मौजे मोडाळे ता. इगतपुरी जि. नाशिक ही ग्रामपंचायत देशात तृतीय आली.
- नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत सतत विकास पुरस्कार श्रेणी आणि ग्राम ऊर्जा स्वराज विशेष सवंर्ग पुरस्कार अशा दोन श्रेणींमध्ये मन्याचीवाडी ता. पाटण जि. सातारा ही ग्रामपंचायत देशात प्रथम आली.याच श्रेणीमध्ये उत्कृष्ट पंचायत समिती म्हणून तिरोरा पंचायत समिती जि. गोंदिया तृतीय आली.
- कार्बन न्युट्रल विशेष पुरस्कार श्रेणीमध्ये मौजे बेळा ता. जि. भंडारा ग्रामपंचायत देशात प्रथम आली असून पंचायत क्षमता निर्माण सर्वोत्तम संस्था पुरस्कारअंतर्गत पुणे येथील यशदा अकॅडमी देशात तृतीय क्रमांक मिळाला आहे.
पहिले बालरंगभूमी संमेलन
- बालरंगभूमी परिषदेच्या वतीने 20 ते 22 डिसेंबर या कालावधीत पुण्यातील अण्णा भाऊ साठे नाट्यगृह येथे पहिले बालरंगभूमी संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
- प्रसिद्ध नाट्य- चित्रपट अभिनेते मोहन जोशी यांची या संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.
- संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमास अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, अभिनेते सयाजी उपस्थित राहणार आहेत.
सशस्त्र सेना ध्वज
- भारतात दरवर्षी 7 डिसेंबर रोजी सशस्त्र सेना ध्वज दिन साजरा केला जातो.
- या दिवसाचा उद्देश भारतीय सशस्त्र दलातील सैनिकांना आणि त्यांच्या कुटुंबांना सन्मान देणे हा आहे.
- या दिवशी, भारतीय ध्वज, बॅचेस, स्टिकर्स आणि इतर वस्तू विकून सशस्त्र दलातील कर्मचाऱ्यांच्या भल्यासाठी लोकांकडून निधी गोळा केला जातो.
- 28 ऑगस्ट 1949 रोजी भारताच्या तत्कालीन संरक्षण मंत्र्यांच्या अधिपत्याखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती.
- या समितीने दरवर्षी 7 डिसेंबर रोजी ध्वज दिन पाळण्याचा निर्णय घेतला.
- 1993 मध्ये, भारताच्या संरक्षण मंत्रालयाने संबंधित कल्याण निधीचे एकल सशस्त्र सेना ध्वज दिन निधीमध्ये एकत्रीकरण केले.
- या निधीत युद्ध शोकग्रस्त, युद्ध अपंग आणि इतर माजी सैनिक/सेवा कर्मचाऱ्यांसाठी एकत्रित केलेला विशेष निधी समाविष्ट आहे.