Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाच्या सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

  • Home
  • Current Affairs
  • Current Affairs 2024
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाच्या सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित
  • भारत-रशिया संबंध बळकट करण्यासाठीच्या योगदानाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना क्रेमलिनमधील सेंट अँड्र्यू हॉलमध्ये एका विशेष समारंभात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी रशियाचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार “ ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपॉस्टल” प्रदान केला.
  • 2019 मध्ये या पुरस्काराची घोषणा करण्यात आली होती.
  • हा पुरस्कार स्वीकारताना पंतप्रधानांनी तो भारतातील नागरिकांना तसेच भारत आणि रशिया यांच्यातील मित्रत्वाच्या पारंपरिक बंधांना  समर्पित केला.
  • हा बहुमान उभय देशांमधील खास आणि विशेषाधिकारप्राप्त धोरणात्मक भागीदारी अधोरेखित करतो असेही त्यांनी नमूद केले.
  • या पुरस्काराची सुरुवात 300 वर्षांपूर्वी करण्यात आली होती.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या पुरस्काराने सन्मानित होणारे पहिले भारतीय नेते आहेत.
  • रशियाशी संबंध दृढ करण्यासाठी आंतरराष्ट्रीय नेतृत्वासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो.
  • भारत आणि रशियामधील संबंध दृढ करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  • 1698 मध्ये पीटर द ग्रेट यांच्याकडून यशू यांचे पहिले प्रेरित आणि सेंट अँड्रयू यांच्या सन्मान करण्यासाठी ऑर्डर ऑफ सेंट अँड्रयू द अपॉस्टल हा सर्वोत्तम पुरस्कार हा नागरिक आणि सैनिकांना दिला जात असतो.
  • अलिकडच्या काही वर्षांत हा सन्मान गैर-रशियन व्यक्तींना देण्याची परंपरा सुरू झाली होती.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींपूर्वी हा सन्मान चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग, कझाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष नजरबायेव आणि अझरबैजानचे राष्ट्राध्यक्ष हैदर अलीयेव यांना देण्यात आला आहे.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *