● पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ब्राझीलच्या नॅशनल ऑर्डर ऑफ द सदर्न क्रॉसचा ग्रँड कॉलर या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
● ब्राझीलचे अध्यक्ष लुईस इनासिओ लुला डिसिल्वा यांनी मोदींना हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान दिला. मोदी यांना मिळालेला हा 26 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे
● ब्राझील आणि भारत यांच्यादरम्यान द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी आणि जागतिक व्यासपीठांवर भारत-ब्राझील सहकार्य वाढवण्यासाठी दिलेले लक्षणीय योगदान यासाठी मोदींचा हा गौरव केला जात असल्याचे ब्राझीलकडून सांगण्यात आले.



