भूतानने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘ऑर्डर ऑफ द ड्रुक ग्यालपो’ (Order of the Druk Gyalpo) देऊन सन्मानित केले. भूतानचा हा सर्वोच्च नागरीक सन्मान आहे. पीएम मोदी हे हा सन्मान दिला जाणारे पहिले परदेशी नागरीक आहे. हा पुरस्कार भूतानसाठी खूप महत्वाचा मानला जातो आणि समाजिक जीवनातील कार्य आणि योगदानाचे प्रतीक मानला जातो.
अधिक माहिती
• हा पुरस्कार त्याची सुरूवात झाल्यापासून केवळ चार प्रतिष्ठित व्यक्तींना देण्यात आला आहे.
• पीएम मोदी यांना अतापर्यंत तब्बल 15 देशांनी आपल्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले आहे.
• यापूर्वी भूतानचा हा पुरस्कार चार जणांना देण्यात आला आहे.
• यामध्ये 2008 साली भूतानच्या राणी दादी आशी केसांग चोडेन वांगचुक यांना तो देण्यात आला होता.
• तसेच हा सन्मान 2008 साली जे थ्रिजुर तेनजिन डेंडुर (भूतानचे 68वे जे खेंपो) आणि 2018 मध्ये जे खेंपो ट्रुलकु न्गावांग जिग्मे चोएद्रा यांना हा पुरस्कार मिळाला.


