परदेशातील उद्योगांकडून भारतात येणाऱ्या थेट परकीय गुंतवणुकीमध्ये गेल्या वर्षात सर्वाधिक परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात झाले असल्याचे केंद्र सरकारच्या उद्योग संवर्धन व अंतर्गत व्यापार विभागाने(डीपीआयआयटी) स्पष्ट केले.
महाराष्ट्रात परदेशी उद्योगांनी एकूण 1 लाख 18 हजार 422 कोटी रुपयांची गुंतवणूक केली
परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत महाराष्ट्राने गुजरात आणि कर्नाटकला मागे टाकले आहे.
आर्थिक वर्ष 2021- 22 च्या तुलनेत राज्यातील परकीय गुंतवणूक 4000 कोटी रुपयांनी वाढली आहे.
केंद्र सरकारच्या उद्योग संवर्धन व अंतर्गत व्यापार विभागाने नुकतीच परकीय परकीय गुंतवणुकीची आकडेवारी प्रसिद्ध केली . या आकडेवारीनुसार 2022 -23 या आर्थिक वर्षात महाराष्ट्राने बाजी मारली आहे.
सेवा, कम्प्युटर क्षेत्रात सर्वाधिक गुंतवणूक:
गेल्या वर्षभरात देशात झालेल्या एकूण परकीय गुंतवणुकीपैकी 31% गुंतवणूक सेवा व कम्प्युटर सॉफ्टवेअर व हार्डवेअर क्षेत्रात करण्यात आली आहे.
सेवा क्षेत्रात सुमारे 15% गुंतवणूक झाली असून, 16 टक्के गुंतवणूक कम्प्युटर ,सॉफ्टवेअर व हार्डवेअर क्षेत्रात झाली आहे . त्यापाठोपाठ ट्रेडिंग (6%), दूरसंचार (6%), ऑटोमोबाईल (6%),असे गुंतवणूक क्षेत्र आहेत
या देशातून गुंतवणूक:
गेल्या वर्षी अमेरिका ,जपान ,मॉरिशस ,नेदरलँड, ब्रिटन ,जर्मनी, संयुक्त अरब अमिराती, सिंगापूर या देशाने सर्वाधिक गुंतवणूक देशात आणि महाराष्ट्रात केली आहे.
देशात सर्वाधिक परकीय गुंतवणुक केलेली राज्य आणि केंद्रशासित प्रदेश (2022 -23)
1) महाराष्ट्र – 1 ,18, 422 कोटी
2) गुजरात – 37,059 कोटी
3)कर्नाटक – 83, 628 कोटी
4) दिल्ली – 60,119 कोटी
5)तमिळनाडू – 17,247 कोटी
6) हरियाणा – 20,735 कोटी


