- स्थानिक ‘गन फॉर ग्लोरी’ या नेमबाजी प्रशिक्षण संस्थेचे सहसंस्थापक आणि राष्ट्रीय रायफल संघटनेचे संयुक्त महासचिव पवन सिंह यांची सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिकमध्ये नेमबाजी पंच म्हणून निवड करण्यात आली आहे.
- पवन यांची यापूर्वी टोकियो ऑलिम्पिकसाठीही पंच म्हणून निवड झाली होती.
- पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पवन सिंह ‘आरटीएस’ (रिझल्ट, टाईमिंग आणि स्कोअरर) पंच म्हणून काम पाहणार आहेत.
- ऑलिम्पिक स्पर्धेत पंच म्हणून काम पाहणारे पवन हे एकमेव भारतीय आहेत.