“पाणलोट यात्रा” अभियान
केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी “पाणलोट यात्रा”, या देशव्यापी जनसंपर्क अभियानाचा हायब्रीड (दूरस्थ आणि प्रत्यक्ष) माध्यमातून शुभारंभ केला. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या (डब्ल्यूडीसी-पीएमकेएसवाय 2.0) पाणलोट क्षेत्र विकास घटकांतर्गत प्रकल्प क्षेत्रात राबवल्या जाणाऱ्या पाणलोट क्षेत्र विकास उपक्रमांमध्ये लोकसहभाग वाढवून त्याबाबत जनजागृती निर्माण करणे, हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे.



