देशात सौरऊर्जा आणि शाश्वत विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारद्वारे ‘प्रधानमंत्री सूर्यघर, मोफत वीज योजना’ सुरू ने केली जात असल्याचे 13 फेब्रुवारी रोजी जाहीर केले. या योजनेअंतर्गत देशभरात एक कोटी घरांना दरमहा 300 युनिटपर्यंत मोफत वीज उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे.
अधिक माहिती
● या प्रकल्पासाठी हजारो कोटींच्या गुंतवणुकीची गरज असेल असे पंतप्रधानांनी सांगितले.
● पंतप्रधान मोदी म्हणाले की, “शाश्वत विकास आणि लोकांच्या कल्याणासाठी आम्ही ‘प्रधानमंत्री सूर्यघर, मोफत वीज योजना’ सुरू करत आहोत.
● 75 हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचे दरमहा एक कोटी घरांना 300 युनिटपर्यंत मोफत वीजपुरवठा करण्याचे उद्दिष्ट् आहे.
● यासाठी मोठ्या प्रमाणात अनुदान दिले जाणार असून अनुदानाची रक्कम थेट लाभार्थींच्या खात्यात जमा होणार आहे.