प्रसिद्ध ओडिसी नर्तक मायाधर राऊत यांचे निधन
- प्रसिद्ध ओडिसी नर्तक मायाधर राऊत यांचे त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले.
- पद्मश्री पुरस्काराने सन्मानित मायाधर यांचा जन्म 6 जुलै 1933 रोजी ओडिशामध्ये झाला.
- त्यांना ओडिसी नृत्याचे जनक मानले जाते.
- 1950च्या दशकात शास्त्राधारित ज्ञानाने ओडिसीच्या पुनरुज्जीवन करण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते.
- मायाधर यांनी वयाच्या सातव्या वर्षी शास्त्रीय ओडिसी नृत्याच्या अग्रगण्य अशा ‘गोटीपुआ’ या नृत्यप्रकारापासून प्रशिक्षणाला सुरुवात केली.
- 1944मध्ये हा नृत्यप्रकार रंगमंचावर सादर करणारे पहिले नर्तक होते.
- मायाधार हे 1952मध्ये कटक येथील कला विकास केंद्राचे संस्थापक सदस्य होते. ही भारतातील पहिली संस्था होती, जिथे ओडिसी नृत्य शिकवले जात असे.
- ओडिसी नृत्याच्या विकासासह त्याला शास्त्रीय चौकट प्रदान करण्याच्या उद्देशाने आपल्या सहकाऱ्यांसोबत त्यांनी 1959 मध्ये जयंतिका असोसिएशनची स्थापना केली.
- ओडिसीच्या अभ्यासात ‘संचारी भाव’, ‘मुद्रा विनियोग’ आणि ‘रस सिद्धांत’ मांडण्याचे श्रेय मायाधर यांना जाते.
- त्यांनी 1970 ते 1995 पर्यंत श्रीराम भारतीय कला केंद्रात ओडिसी विभागाचे प्रमुख म्हणून काम पाहिले.
- 1971 मध्ये दिल्लीतील प्रसिद्ध कमानी सभागृहाचे उद्घाटन त्यांच्या ‘गीत गोविंद’ या सादरीकरणाने झाले होते.
- ओडिसी नृत्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल मायाधर यांना ओडिशा संगीत नाटक अकादमी पुरस्कार (1977), साहित्य कला परिषद पुरस्कार (1984), संगीत नाटक अकादमी पुरस्कार (1985), राजीव गांधी सद्भावना पुरस्कार (2003) आणि टागोर अकादमी रत्न (2011) आदी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.