प्रसिद्ध कवी आणि चित्रकार इमरोज यांचे वयाच्या 97 वर्षी वृद्धपकाळाने निधन झाले. इमरोज यांचे मूळ नाव इंद्रजीत सिंग होते. कवी व चित्रकार इमरोज यांचा जन्म 26 जानेवारी 1926 मध्ये लाहोर पासून शंभर किलोमीटर अंतरावरील ल्यालपूर या गावात झाला.
• इमरोज यांचे शालेय शिक्षण उर्दूतून झाले.
• पुढे आर्ट स्कूलमध्ये त्यांनी चित्रकलेचे धडे गिरवले. त्यानंतर त्यांनी पुस्तकांचे डिझाईन बनवण्याचे काम सुरू केले.
• इमरोज यांनी जगजीत सिंग यांच्या ‘बिरहा दा सुलतान’ आणि बीबी नूरणच्या ‘कुली रह विचार’सह अनेक प्रसिद्ध ‘एलर्पि’चे मुखपृष्ठ तयार केले. तसेच त्यांचे अनेक कविता ही प्रसिद्ध आहेत.